आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर (LG) व्ही के सक्सेना यांनी सत्ताधारी आम आदमी पार्टीकडून 97 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिलेत. त्यासाठी पक्षाला 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या प्रचारासाठी सरकारी पैशाचा वापर केला. हे सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन आहे, असा ठपका उपराज्यपालांनी ठेवला आहे. केजरीवालांनी राजकीय जाहिराती सरकारी जाहिराती म्हणून प्रकाशित केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
हायकोर्टाच्या समितीचा AAPवर ठपका
ऑगस्ट 2016 मध्ये हायकोर्टाने या प्रकरणी 3 सदस्यीय समिती स्थापन केली होती. समितीला जाहिरातींवर खर्च करण्यात आलेल्या पैशाचा तपास करण्याचे आदेश दिलेत. समितीने 16 सप्टेंबर 2016 रोजी आपला अहवाल सुपूर्द केला होता. त्यात आपला दोषी धरण्यात आले होते. या अहवालात नमूद करण्यात आले होते की, पक्षाने सरकारी जाहिरातींचा वापर स्वतःसाठी केला. यासंबंधीच्या वृत्तानुसार, सप्टेंबर 2016 पासून आतापर्यंत दिल्ली सरकारच्या सर्वच जाहिरातींची तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे.
एका महिन्यात जाहिरातींवर 24 कोटींचा खर्च केल्याचा आरोप
जून 2022 मध्ये विरोधकांनी दावा केला होता की, AAP सरकारने एका महिन्यात जाहिरातींवर तब्बल 24 कोटींचा खर्च केला. यासाठी माहिती अधिकार कायद्याद्वारे मिळालेल्या माहितीचा दाखला देण्यात आला. आप सरकारी तिजोरी भरण्याचा दावा करून सत्तेत आला. पण आता हा पक्ष स्वतःच ही तिजोरी रिकामी करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप विरोधकांनी या प्रकरणी केला.
काँग्रेसचे पंजाब प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वडिंग, काँग्रेस आमदार सुखपाल खैहरा व भाजप नेते मनजिंदर सिरसा यांनी यासंबंधी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
खैहरांनी विचारले - अशी भरणार पंजाबची तिजोरी
काँग्रेस आमदार सुखपाल खैरा यांनी गत जून महिन्यात RTI माहितीची कॉपी ट्विट केली होती. त्यात ते म्हणाले होते की, केवळ एप्रिल महिन्याच्या पब्लिसिटीवर 24 कोटींचा खर्च करण्यात आला होता. अरविंद केजरीवाल व भगवंत मान यांनी पंजाबची तिजोरी अशा प्रकारे भरण्याचे आश्वासन दिले होते का? हे सांगावे. खैहरा म्हणाले - एक आमदार-एक पेंशन योजनेतून सरकारला केवळ 8 कोटी रुपयांचा निधी वाचवता येईल. पण त्यांनी एका महिन्यातच एवढा मोठा खर्च केला आहे. केजरीवाल व भगवंत मान स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशाचा दुरुपयोग करत आहेत.
भाजपचा आरोप - 3 महिन्यांत 9 हजार कोटींचे कर्ज व प्रसिद्धीवर 24 कोटींचा खर्च
भाजप नेते मनजिंदर सिरसा जूनमध्ये म्हणाले होते की, आम आदमी पार्टीच्या सरकारने मागील 3 महिन्यांत 9 हजार कोटींचे कर्ज घेतले. केवळ एप्रिल महिन्यातच सरकारच्या प्रसिद्धी व जाहिरातींवर 24.40 कोटींचा खर्च केला.
पंजाबच्या एकाही महिलेला अजून दरमहा 1 हजार रुपये देण्यात आले नाही. वीज-पाण्यावरही सबसिडी देण्यात आली नाही. एकही काम केले नसताना सरकार प्रसिद्धीवर का खर्च करत आहे याचे उत्तर मुख्यमंत्री भगवंत यांनी द्यावे. ही क्रांती नाही, केजरीवालांचे दिल्ली मॉडल आहे, असेही सिरसा म्हणालेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.