आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआम आदमी पार्टी (AAP) आपले युवा नेते राघव चढ्ढा यांना पंजाबमधून राज्यसभेवर पाठवत आहे. चढ्डा यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीत सहप्रभारी म्हणून काम केले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आपचा 117 पैकी 92 जागांवर विजय झाला. याचे बक्षीस त्यांना दिले जात आहे. चढ्ढा यांच्यासह जालंधरचे क्रिकेटपटू हरभजन सिंग व दिल्ली आयआयटीचे सहयोगी प्राध्यापक संदीप पाठक यांनाही राज्यसभेवर पाठवण्यात येऊ शकते. पाठक यांनी पंजाब निवडणुकीत पडद्यामागे राहून आपच्या विजयाची रणनिती ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. पंजाबमध्ये राज्यसभेच्या 5 जागा रिक्त होत असून, त्यावर लवकरच निवडणूक होणार आहे.
पंजाबमध्ये यशस्वी ठरली चढ्ढांची रणनिती
राघव चढ्ढा आपचे पंजाब सहप्रभारी होते. पण, पक्षाची संपूर्ण प्रचार मोहिम त्यांच्याभोवतीच फिरत होती. त्यांनी काँग्रेसचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांची चौफेर कोंडी करुन आपची प्रतिमा निर्मिती केली. विशेषतः अवैध वाळू उत्खनन प्रकरणातील त्यांच्या व्यूहरचनेपुढे चन्नी यांचा कोणताही निभाव लागला नाही. सध्या चढ्ढा दिल्ली विधानसभेचे सदस्य आहेत.
हरभजनकडे क्रीडा विद्यापीठाचीही जबाबदारी
आप क्रिकेटर हरभजन सिंग यांना राज्यसभेवर पाठवण्यासह त्यांच्याकडे क्रीडा विद्यापीठाचीही जबाबदारी सोपवणार आहे. तीन महिन्यांपूर्वीच हरभजन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. सलग 23 वर्षांपर्यंत क्रिकेट जगतात "टर्बनेटर" म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भज्जीने क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर थेट जालंधरचे बर्ल्टन पार्क गाठले होते. कारण, त्याने येथूनच आपले करिअर सुरू केले होते. याच मैदानातून खेळताने भज्जीने संपूर्ण जगात देश व पंजाबचे नाव रोशन केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.