आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aarti Of Ramallah By Muslim Women In Kashi; Distribution Of Laddu In Many Places Including Chhattisgarh

देशभरात हर्षोल्हास:काशीत मुस्लिम महिलांनी रामलल्लांची केली आरती; छत्तीसगडसह अनेक ठिकाणी लाडू वाटप

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
बाबा विश्वनाथाच्या नगरीत आरती करताना मुस्लिम महिला. - Divya Marathi
बाबा विश्वनाथाच्या नगरीत आरती करताना मुस्लिम महिला.

राम मंदिर भूमिपूजनासह रामनगरी अयोध्येत रामकथेचा नवा अध्याय सुरू झाला आहे. बुधवारच्या भूमिपूजनाची चर्चा देश-विदेशात होत आहे. देशभरात लोकांमध्ये हर्षोल्हास आहे. बाबा विश्वनाथाची नगरी काशीत मुस्लिम महिलांनी भगवान श्रीरामाची आरती करून जल्लोष केला.

महाराष्ट्र, छत्तीसगडमध्ये कारसेवकांनी लाडू वाटून राम मंदिर साकार होत असल्याबद्दलचा आनंद व्यक्त केला. पूर्व दिल्लीत रामभक्तांनी फुलझाडे लावली. आतषबाजी केली होती. विवेक विहार येथील श्रीराम मंदिर व लक्ष्मीनगरमध्ये स्क्रीन लावून भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले होते. मंदिरात भाजपचे खासदार गौतम गंभीर, राज्यसभा सदस्य दुष्यंत गौतमही उपस्थित होते.

हरियाणाच्या फरिदाबाद पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे सरचिटणीस मनमोहन गुप्ता यांनी ५ हजार लाडू करून त्याचे वाटप केले.

ते वाहनचालकांना लाडू देत होते. छत्तीसगडच्या राजनंदगावच्या महापौरांनी शहरातील ऐतिहासिक राणी सागराचे नाव भगवान राम व माता सीता असे नामकरण करण्यात आले. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी भोजपूर बाजारात सुंदरकांड पाठाचे आयोजन केले होते. बिहारच्या भागलपूरमध्ये दीप प्रज्वलित करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...