आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aasam Guvahati High Court Updates; A Person Does Not Become A Foreigner If He Does Not Prove A Relationship With Relatives; News And Live Updates

नागरिकत्व व्यक्तीचा महत्त्वपूर्ण अधिकार:नातेवाइकांशी संबंध सिद्ध न केल्यास व्यक्ती परदेशी ठरत नाही; आसाम उच्च न्यायालयाचा निर्वाळा

गुवाहाटी2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आसाममध्ये परदेशसंबंधी प्राधिकरणाने ३० जानेवारी २०१९ राेजी हैदर अली यांना परदेशी घाेषित केले हाेते

एखादा मनुष्य मतदार यादीद्वारे आई-वडील व मागील पिढीशी असलेले नाते सिद्ध करताे. मात्र सर्व नातेवाइकांशी असलेले संबंध सिद्ध न केल्याचे कारण दाखवून व्यक्तीस परदेशी ठरवता येऊ शकत नाही, असे गुवाहाटी उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. आसाममध्ये परदेशसंबंधी प्राधिकरणाने ३० जानेवारी २०१९ राेजी हैदर अली यांना परदेशी घाेषित केले हाेते. वास्तविक त्यांनी वडील, आजाेबांच्या नावाशी आपला संबंध प्रमाणित केला हाेता. त्यांची नावे १९६५ व १९७० च्या मतदार यादीत हाेते. मात्र यंत्रणेच्या म्हणण्यानुसार मतदार यादीतील इतर नातेवाउकांसाेबतचे संबंध हैदरला सिद्ध करता आले नव्हते. त्याबाबत न्यायमूर्ती एन. काेटिश्वर सिंह यांनी प्राधिकरणाचे आदेश रद्दबातल ठरवले. मतदार यादीतील इतर नातेवाइकांशी असलेला संबंध सिद्ध करण्यात हैदर यांना यश अाले नाही, परंतु त्यामुळे आजाेबांशी त्यांच्या नात्याबाबतच्या विश्वासार्हतेला काही धक्का बसला असे हाेत नाही.

हायकाेर्ट म्हणाले, हार्मुज अली त्यांचे वडील आहेत व नादू मिया यांचे ते अपत्य असल्याचे हैदर यांनी सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करणे गरजेचे हाेते. ते स्वीकार्ह रूपात भारतीय हाेते. १९७० व १९६५ च्या मतदार यादीवरून ते सिद्ध झाले आहे. कारण त्याबाबत सरकारने काहीही प्रश्न उपस्थित केलेला नाही. म्हणूनच १९७० ची मतदार यादीतील इतर नावांशी नातेवाइकांचा तपशील जुळत नसला तरी त्यांच्या सत्यतेवर संशय घेण्याचा ताे आधार ठरत नाही, असे काेर्टाने सांगितले. आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकत्व दस्तएेवजात नाव नाेंदवण्यासाठी २४ मार्च १९७१ च्या तारखेपू्र्वीपासून भारतात वास्तव्याला असलेल्या लाेकांना आपले नातेवाईक सिद्ध करणे अनिवार्य आहे.

बातम्या आणखी आहेत...