आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aashadhi Updates: Prime Minister Narendra Modi Message On Aashadhi; News And Live Updates

आषाढी एकादशी:पंतप्रधान मोदी यांनी मराठीत ट्विट करत दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा; म्हणाले - वारकरी चळवळ हे आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदींनी काय ट्विट करत काय म्हटले आहे?

आषाढी एकादशीनिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कोरोना महामारीचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता सलग दुसऱ्या वर्षी हा उत्सव कोरोना नियमांचे पालन करत साजरा करावा लागत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सकाळी पहाटे ही शासकीय महापूजा पार पडली यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेदेखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी आषाढी एकादशीनिमित्त मराठीतून ट्विट करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मोदींनी काय ट्विट करत काय म्हटले आहे?
आज आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधानांनी मराठीत ट्विट करत वारकरी परंपरेचं महत्व पटवून दिले आहेत. ते ट्विट करत म्हटले की, "आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे."