आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Abhijita Gupta, Who Wrote The Book At The Age Of 7, Became The Youngest Writer, Has Registered Several Names

कविता आणि कथा दोन्ही लिहिण्यात हुशार:वयाच्या 7 व्या वर्षी पुस्तक लिहिणारी अभिजीता गुप्ता बनली सर्वात कमी वयाची लेखिका, आपल्या नावावर नोंदवले आहेत अनेक विक्रम

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिला आतापर्यंत एशिया बुक ऑफ रिकॉर्ड्स आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रिकॉर्ड्सने सन्मानित केले आहे
  • अभिजीताने हे पुस्तक केवळ 3 महिन्यात लिहिले आहे, तिचे पुस्तक मुलांना खूप आवडत आहेत

सात वर्षांच्या अभिजीता गुप्ताचे नुकतेच एक पुस्तक रिलीज झाले आहे. या पुस्तकाचे नाव 'हॅप्पीनेस आल अराउंड' आहे. हे पुस्तक लिहिल्यानंतर ती सर्वात कमी वयाची लेखिका बनली आहे.

तिला आतापर्यंत एशिया बुक ऑफ रिकॉर्ड्स आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रिकॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले आहे. अभिजीताने हे पुस्तक केवळ 3 महिन्यांमध्ये लिहिले आहे. अभिजीताचे पुस्तक मुलांना खूप आवडत आहे. अभिजीता आपल्या देशातील प्रसिद्ध कवी स्वर्गीय मैथिलीशरण गुप्त यांची नात आहे. आपल्या पुस्तकासाठी तिला गेल्या महिन्यात मेडल आणि सर्टिफिकेट मिळाले. तेव्हा ती केवळ पाच वर्षांची होती, तेव्हा आपल्या पालकांना लिहिण्यासाठी एक कॉपी आणि पेंसिल मागायची.

अभिजीताची आई अनुप्रिया म्हणजे - 'मला हे पाहून आर्श्चर्य वाटले की, अभिजीताने जे पुस्तक लिहिले त्यामध्ये केवळ एक किंवा दोन स्पेलिंग मिस्टेक होत्या. मी तिची लिहिण्याची क्षमता पाहून हैरान आहे. अभिजीताने आपली पहिली कथा 'द एलिफेंट एडव्हाइज' लिहिली होती. तिच्या पहिल्या कवितेचे नाव 'ए सनी डे' हे आहे. या दोन्ही तिच्या पुस्तकात आहेत'

अभिजीता म्हणते - 'माझ्या लेखनामध्ये सकारात्मक विचार दिसतात कारण माझ्या पालकांनी मला शिकवले आहे की, आपण प्रत्येक परिस्थितीत पॉझिटिव्ह राहायला हवे.' अभिजीताने आपल्या पुस्तकामध्ये इलस्ट्रेशनही स्वतःच बनवले आहे. हे चिमुकली दुसरीतच आहे. आपले पुस्तक अभिजीताने लॉकडाउनदरम्यान घरात असताना लिहिले. तिला रस्किन बॉन्ड आणि सुधा मूर्ती यांच्याविषयी वाचायला आवडते.

बातम्या आणखी आहेत...