आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • About 200 Leaders, Officers, Builders Go And Eat In Jail At Least Once Every Year As An Escape From Prison Yoga In Horoscope!

इन्व्हेस्टिगेशन:कुंडलीतील तुरुंग योगापासून बचाव म्हणून सुमारे 200 नेते, अधिकारी दरवर्षी एकदा तरी तुरुंगात जाऊन जेवतात!

ओमप्रकाश शर्मा | जयपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात दरवर्षी सुमारे २०० नेते, अधिकारी, बिल्डर, व्यावसायिक जेवणासाठी तुरुंगात जातात. कारण तुमच्या कुंडलीत तुरुंग योग आहे. तुरुंगात जाऊन खाल-प्याल तर संकट टळेल, असे ज्योतिष्याने त्यांना सांगितले आहे. याची पुष्टी करण्यासाठी भास्करच्या बातमीदाराने जयपूर तुरुंगात जेवणाची मागणी केली असता त्यालाही ते सहज मिळाले. इथे १८०० कैद्यांसाठी रोज जेवण बनवले जाते. सूत्रांनुसार, तुरुंगात कैद्यांचा जबाब घेण्यासाठी येणारे पोलिस अधिकारीही तेथील अन्न खातात. ज्योतिषाचार्य दामोदर प्रसाद म्हणाले, ‘तुरुंगातील अन्नाचे सेवन करण्याचा सल्ला ५०% पर्यंत काम करतो. दर महिन्याला सुमारे ४ लोकांना मी हा उपाय सांगतो.’ कसा चालतो जेल योग टाळण्याचा हा खेळ जाणून घेऊया सविस्तर...

जयपूर तुरुंगात प्रहरीच आणून देतात जेवण हे छायाचित्र तुरुंग परिसरात जेवणाऱ्या दौलत मीणा यांचे आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार होते. योग टाळण्यासाठी त्यांनी मुख्य द्वारावर एका प्रहरीला जेवण मागितले. त्याने मीणा यांना मेसमध्ये बसवले व थोड्याच वेळात एका प्लेटमध्ये डाळ-भाजी आणली. मीणा जेवले आणि निघाले.

‘मी केंद्र सरकारविरोधात अनेक आंदोलने केली. त्यामुळे मला कोणत्याही प्रकरणात अडकवले जाऊ शकते. पण, मला तुरुंगाबाहेर राहून लोक व समाजाची सेवा करायची आहे. त्यामुळेच मी तुरुंगातील अन्न सेवन केले.’ - दौलत मीणा, काँग्रेसचे विधानसभा उमेदवार

जेवण घेण्याच्या २ पद्धती पहिली : कैद्यांसाठी असलेले जेवण तिथेच करा, पाणीही तिथेच प्या. दुसरी : काही लोक बदनामीच्या भीतीने तुरुंगातील कणीक, चपाती व डाळ पॅक करून घरी नेतात. तुरुंगाच्या मुख्य द्वारावर त्यांच्यासाठी जेवणाचे पॅकेट येते.

आयएएस अधिकारीही जेवले सूत्रांनी सांगितले, आयएएस अधिकारी लालचंद असवाल, जी. एस. संधू व सीएम सल्लागार बाबुलाल नागर यांना जामीन मिळत नव्हता. त्यांनीही तुरुंगात जाऊन जेवण केले.

बिकानेर : मानवतेच्या दृष्टीने जेवण देतात कारागृह अधीक्षक आर. अनंतेश्वर म्हणाले, लोक ज्योतिष्याच्या सल्ल्यानुसार जेवण मागतात. त्यामुळे आम्ही मानवतेच्या दृष्टीने त्यांना देतो.

अजमेर : योग टळणे हा एक भ्रम आहे अजमेर हाय सिक्युरिटी जेलचे अधीक्षक पारस जांगीड सांगतात, ‘तुरुंगातील अन्नसेवनाने योग टळतो असा काही लोकांना भ्रम आहे.’

बातम्या आणखी आहेत...