आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या 15 ते 18 वर्षांच्या मुलांच्या लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन शनिवारपासून सुरू झाले आहे. कोविन अॅपच्या आकड्यांनुसार पहिल्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत 3 लाख 15 हजार मुलांनी लसीकरणासाठी स्लॉट बुकिंग केली आहे. देशभरात या वयोगातील जवळपास 10 कोटी मुलांना लस दिली जाणार आहे.
नोंदणीसाठी 10वी ओळखपत्र देखील वैध आहे
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 15-18 वयोगटातील मुलांना फक्त भारत बायोटेकची कोवॅक्सिन दिली जाईल. CoWIN प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ. आर.एस. शर्मा यांनी सांगितले होते की नोंदणीसाठी 10वी ओळखपत्र देखील आयडेंटीटी प्रूफ म्हणून ग्राह्य धरले जाईल.
कारण काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र नसतील. सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, 15-18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी CoVin व्यतिरिक्त, व्हेरिफाय/ व्हॅक्सीनेटरच्या माध्यमातून ऑन-साइटही लसीच्या स्लॉटची बुकिंग केली जाऊ शकते.
मुलांच्या लसीकरणाच्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस
वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी केली होती घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस देण्याची घोषणा केली होती. यासोबतच, कॉमोरबिडीटीच्या कक्षेत येणाऱ्या 60+ वयोगटातील अशा वृद्धांना 10 जानेवारीपासून लसीचा डोस देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली होती. यासोबतच त्यांनी 10 जानेवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्सलला देखील प्रिकॉशन डोस देण्याची घोषणा केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.