आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझारखंडच्या पाकुडमध्ये बुधवारी सकाळी एका भीषण अपघातात 15 लोकांचा मृत्यू झाला. पाकुडहून दुमका येथे जात असलेली बस लिट्टीपाडा-अमडापाडा रोडवर पडेरकोलाजवळ गँस सिलेंडरने भरलेल्या ट्रकला धडकली. बसमध्ये 40 पेक्षा जास्त लोक होते अशी माहिती मिळाली आहे. यामध्ये जवळपास 20 लोक जखमी आहेत.
ही धडक एवढी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. बसमध्ये बसलेले लोक त्यात अडकले. बसची बॉडी कापून लोकांना बाहेर काढले जात आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
कृष्णा रजत बस आणि एलपीजी सिलिंडरने भरलेल्या ट्रकची धडक इतकी वेगवान होती की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. सध्या ठार झालेल्या लोकांची ओळख पटलेली नाही. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच प्रथम स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले. प्रशासन आणि पोलिस येण्यापूर्वीच ते मदत आणि बचाव कार्यात गुंतले. अपघातानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाचे उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.