आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Accident । Bihar । 6 Killed, 4 Seriously Injured In Truck sumo Accident; Incident At Lakhisarai, Bihar

काळाने घातला घाला:ट्रक आणि टाटासुमोचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू तर 4 जण गंभीर; बिहारच्या लखीसराय येथील घटना

लखीसराय13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारच्या लखीसराय जिल्ह्यातील सिकंदरा-शेखपुरा येथे भीषण अपघात झाला आहे. भरधाव येणाऱ्या ट्रक आणि सूमोच्या झालेल्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी सहा वाजेदरम्यान ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. अपघात इतका भयकंर होता की, मृतामधील दोन जण ट्रकमध्ये अडकले होते. त्यानंतर मोठया प्रयत्नाने त्याच्या मृतदेहाला बाहेर काढण्यात आले.

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलीसांनी दिली आहे. पोलीस दोन तासानंतर घटनास्थळी दाखल झाली आहे. या अपघातात मृत्यू झालेल्याची ओळख पटली असून ते जमुई जिल्ह्यातील आहे. छठपूजेसाठी ते पटना येथे गेले होते. त्यानंतर घरी परतत असताना गॅस सिलेंडर घेऊन येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांचा सूमो गाडीला धडक दिली आहे.

मृत्यू झालेले एकाच कुटूंबातील होते

मिळालेल्या माहितीनुसार, हा कुटूंब छठपूजेसाठी पटनाला होता. त्यानंतर आज सकाळी परतत असताना त्यांचा अपघात झाला आहे. या सुमोमध्ये एकूण दहा जणांचा समावेश होता. त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीररित्या जखमी आहे. त्यांना सिंकदरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन जणांचा प्रकृती चिंताजणक असून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्याचा डॉक्टरांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...