आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Accident Happened On Faridkot Amritsar NH Near Village Dhuri, Traffic Was Disrupted, Many Injured

धुक्यामुळे 11 वाहनांचा विचित्र अपघात:फरीदकोट-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर 11 वाहनांची एकमेकांना धडक; वाहतूक विस्कळीत, अनेक जण जखमी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळा सुरू झाल्याने पंजाबमधील अनेक भागात मंगळवारी हंगामातील पहिले धुके पाहायला मिळाले. धुक्यामुळे फरीदकोटमधील धुरीजवळ फरीदकोट-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर 11 वाहनांचा विचित्र अपघात झाला. वाहने एकमेकांच्या मागून धडकली. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. तर वाहनांचेही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

धुरी गावाजवळ झालेल्या अपघातात इनोव्हा कार ट्रॉलीच्या मागून धडकली.
धुरी गावाजवळ झालेल्या अपघातात इनोव्हा कार ट्रॉलीच्या मागून धडकली.

फरीदकोट-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी धुके दिसून आले. महामार्गावर धुरी गावाजवळ 11 वाहनांची धडक झाली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, धुरी गावातून ट्रॅक्टर ट्रॉली भातपीक घेऊन बाजाराकडे जात होती. धुक्यामुळे मागून येणाऱ्या ट्रॉलीच्या चालकाला ट्रॅक्टर-ट्रॉली दिसली नाही.

पुढे जाणाऱ्या ट्रॉलीला ट्रॉली धडकल्याने दोन्ही वाहने रस्त्याच्या मधोमध पलटी झाली. यानंतर अचानक ब्रेक लागल्याने मागून येणारी इतर वाहने समोरासमोर धडकू लागली. या अपघातात एकूण 11 वाहने एकमेकांवर आदळली. यामध्ये कार ते मोठ्या वाहनांचा समावेश आहे.

फरीदकोट-अमृतसर महामार्गावर झालेल्या अपघातात वाहनाचे नुकसान.
फरीदकोट-अमृतसर महामार्गावर झालेल्या अपघातात वाहनाचे नुकसान.

महामार्गावर झालेल्या या अपघातात अनेक जण जखमी झाले. मात्र, अद्याप मृत्यूची नोंद नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. किरकोळ जखमी झालेल्यांवर घटनास्थळीच प्राथमिक उपचार करण्यात आले. अपघातामुळे बंद झालेला महामार्ग पोलीस-प्रशासनाने वाहने हटवून खुला केला.

बातम्या आणखी आहेत...