आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Accident In Ghaziabad । 2 Brother Death In Ghaziabad After Falling From 225 Feet While Playing On Balcony

25 व्या मजल्यावरून पडून दोन्ही जुळ्या भावांचा मृत्यू:बाल्कनीमध्ये खेळतांना 225 फूट उंचीवरून पडून दुर्दैवी मृत्यू, गाजियाबाद येथील हृदयद्रावक घटना

गाझियाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन जुळे भावंडाचा इमारतीच्या 25 व्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना गाझियाबादमध्ये घडली आहे. शहरातील विजयनगर परिसरात एका इमारतीवरून शनिवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. दोघा जुळ्या भावांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. त्या दोघांचे वय 14 वर्षाचे असून दोघेही नववीत शिकत होते. मिळालेल्या माहितीनुसार मुलांची आई घरात होती. तर वडिल काही कामानिमित्त मुंबईला गेलेले होते. त्याचदरम्यान रात्री ही घटना घडली आहे. पोलीसांनी दोघांच्या मृत्यदेहाला पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे. इतक्या रात्री हे मुले इमारतीच्या बाल्कनीमध्ये नेमकं काय करत होते. हे अद्याप अस्पष्ट आहे.

विजयनगर परिसरातील सिद्वार्थ विहार येथील प्रतीक ग्रांड सोसायटीमध्ये 25 व्या मजल्यावर परली नारायण त्यांची पत्नी आणि त्यांचे दोन मुले सोबत राहत होते. परली नारायण यांना सुर्य नारायण व सत्य नारायण अशी दोन जुळे मुले होती. दोघेही नववीत शिकायचे. ज्या दरम्यान ही घटना घडली आहे. त्या दरम्यान मुलांची आई घरात असून, हे दोघेही रात्री दीडच्या सुमारास 25 व्या मजल्यावरून खाली पडले.

जागेवरच मृत्यू
घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर इमारतीत राहणाऱ्या लोकांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या दोन्ही मुलांचे मृत्यू झाल्यानंतर आई बेशुध्द अवस्थेत आहे. सुमारे 225 फुटाच्या अंतरावरून पडल्यानंतर, दोघांच्या डोक्याला जबर मार लागले होते. त्यामुळे त्यांचे जागीच मृत्यू झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...