आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Accidents In MP, UP And Bihar | Roadways Bus Crushed Six Laborers In Uttar Pradesh Muzaffarnagar Today News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघात:तीन राज्यांत झालेल्या विविध अपघातांत 16 मजुरांचा मृत्यू, महाराष्ट्रातून घरी जाणाऱ्या मजुरांवर काळाचा घाला

मुजफ्फरनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
मुझफ्फरनगर येथे रात्री 11:45 वाजता हा अपघात झाला. पोलिसांनी सांगितले की, 10 मजूर पंजाबहून बिहारकडे जात होते. - Divya Marathi
मुझफ्फरनगर येथे रात्री 11:45 वाजता हा अपघात झाला. पोलिसांनी सांगितले की, 10 मजूर पंजाबहून बिहारकडे जात होते.
  • मध्य प्रदेशातील गुना येथील अपघात ठार झालेले मजुर महाराष्ट्रातून परतत होते.

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये झालेल्या विविध अपघातांत 16 मजुरांचा मृत्यू झाला. मध्यप्रदेशातील गुना येथे बस आणि कंटेनरच्या धडकते 8 मजुर ठार झाले. तर 54 जण जखमी झाले. अपघात रात्री 2 वाजता बायपास मार्गावर झाला. हे सर्व मजुर उत्तरप्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील रहिवासी होते. 

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात बुधवारी रात्री एका बसने 6 मजुरांना चिरडले. अशीच एक घटना बिहारमध्ये घडली. येथे प्रवाशांच्या बसची ट्रकला धडक बसली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. 

हा फोटो गुनाच्या हॉस्पिटलचा आहे. अपघातातील जखमी कामगारांना येथे दाखल करण्यात आले.
हा फोटो गुनाच्या हॉस्पिटलचा आहे. अपघातातील जखमी कामगारांना येथे दाखल करण्यात आले.

मध्य प्रदेश: सर्व कामगार महाराष्ट्रातून परत येत होते

मध्य प्रदेशातील गुना येथील अपघात ठार झालेले मजुर महाराष्ट्रातून परतत होते. हे सर्व जण एका कंटेनरमधून उन्नाव जिल्ह्याकडे जात होते. अब्राहम, अजित, अर्जुन, वसीम, रमेश आणि सुधीर अशी मृतांची नावे आहेत. तर इतर दोघांची अद्याप ओळख पटली नाही. 

उत्तर प्रदेश: रात्री उशिरा घडला अपघात, 4 जखमी

  • उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात बुधवारी रात्री 11:45 वाजता रोडवेज बसने पायी जाणाऱ्या मजुरांना चिरडले. या अपघातात 6 जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर चार जखमी झाले. यातील दोन जखमींना उपचारासाठी मेरठकडे रवाना करण्यात आले आहे.
  • पोलिसांनी सांगितले, 10 मजुर पंजाबहून बिहारकडे पायी जात होते. मुजफ्फरनगर-सहारनपूर राज्य महामार्गावरील रोहाना टोल नाक्याजवळ पोहचले होते. या दरम्यान भरधाव आलेल्या रोडवेज बसने यांना चिरडले. अपघातानंतर बसचा चालक फरार झाला.
  • मृत सर्व कामगार बिहारमधील गोपाळगंज येथील रहिवासी होते. हरिकसिंग (52), विकास (22), गुड्डू (18), वासुदेव (22), हरीश साहनी (वय 42) आणि वीरेंद्र (वय 28) अशी त्यांची नावे आहेत. या अपघातात सुशील आणि रामजीतखेरीज इतर दोघेही जखमी झाले. त्याला मेरठ मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.

बिहार: प्रवासी मजुरांची बस मुजफ्फरपूरहून कटिहारकडे जात होती

बिहारमधील समस्तीपूरजवळ प्रवासी मजुरांची बस ट्रकवर आदळली. हा अपघात उशिरा रात्री झाला. यामध्ये दोन जण ठार तर 18 जण जखमी झाले. बस मुजफ्फरपूरहून कटिहारकडे जात होती. या बसमध्ये 32 मजुर होते. 

बातम्या आणखी आहेत...