आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • According To The New Change, The PF Account Of Three And A Half Crore Citizens Will Be Updated Within A Month, Everyone Will Be Able To See The Amount With Interest

नवा बदल:साडेतीन कोटी नागरिकांचे पीएफ खाते अपडेट, महिनाभरात सर्वांनाच व्याजासह रक्कम पाहता येणार

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भविष्य निर्वाह निधी (पीएफ) कायद्यातील बदलानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सॉफ्टवेअरचे अपग्रेडेशन सुुरू आहे. नव्या बदलानुसार आतापर्यंत साडेतीन कोटी खातेधारकांचे पीएफ खाते व्याजासह अपडेट करण्यात आले आहे. त्यामुळे आजपर्यंतची जमा रक्कम खातेदारांना दिसून येत आहे.

एका महिन्याच्या आत सर्व कामगार-कर्मचाऱ्यांच्या खात्यांतही व्याजाची रक्कम ऑनलाइन दिसून येईल, असा दावा ईपीएफओने केला. खात्यातील रक्कम जाणून घेण्यासाठी ईपीएफओने नवा क्रमांक 99660-44425 जारी केला आहे. आपल्या नोंदणीकृत मोबाइलवरून कॉल केल्यास एसएमएसद्वारे खात्याची सर्व माहिती प्राप्त होऊ शकेल.

एकूण २५ कोटी खाती
गतवर्षी एकूण ६.७४ कोटी खातेधारकांकडून रक्कम जमा करण्यात आली. खात्यांची एकूण संख्या २५ कोटी आहे. सर्व खात्यांमध्ये सन २०२१-२२ चे व्याज जमा करण्यात आले आहे. परंतु जी खाती नव्या सॉफ्टवेअरमध्ये अपडेट झाली त्याच खात्यांमधील ऑनलाइन व्याजाची रक्कम दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...