आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महंतांचा मृत्यू:महंतांना भूसमाधी, आरोपी आनंदला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; मृत्यू श्वास रोखल्याने झाल्याचा पोस्टमॉर्टेम अहवाल

लखनऊ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महंत नरेंद्र गिरी यांना साधू-संतांच्या उपस्थितीत भूसमाधी देण्यात आली.

अखिल भारतीय अाखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांना बुधवारी प्रयागराजच्या श्रीमठ वाघंबरी गादी येथे भूसमाधी देण्यात आली. महंतांच्या सुसाइड नोटमध्ये नमूद उत्तराधिकारी बलबीर गिरी यांनी अंत्यसंस्कार केले. यापूर्वी पाच डॉक्टरांच्या पॅनलने पोस्टमाॅर्टेम केले. यात प्राथमिकदृष्ट्या श्वास कोंडल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तथापि, अंतिम अहवाल व्हिसेरा तपासणीनंतर दिला जाणार आहे.

आरोपी आनंद गिरीला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पोस्टमाॅर्टेमनंतर महंतांचा मृतदेह वाघंबरी मठात आणला गेला. अंत्ययात्रा शहरातील विविध मार्गांनी निघून संगमावर पोहोचली. तेथून लेटे हनुमान मंदिर व पुन्हा मठात आणली गेली. तेथे वैदिक मंत्रोच्चारात महंतांना भूसमाधी दिली गेली.

आनंदचा फोन, टॅब्लेट, पेनड्राइव्ह जप्त
दरम्यान, महंतांची हत्या की आत्महत्या हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न करत असलेल्या एसआयटीने आरोपी आनंद गिरीची अनेक तास चौकशी केली. सुसाइड नोटमध्ये उल्लेखित व्हिडिओ आणि त्या मुलीची माहिती विचारली. मात्र आनंदने कोणताच व्हिडिओ नसल्याचे सांगितले. आद्या प्रसाद तिवारी, त्याचा मुलगा संदीपचीही चौकशी केली. पोलिसांनी आनंदचा मोबाइल, टॅब्लेट, पेनड्राइव्ह, सीडी जप्त केली आहे.

झेड सुरक्षा होती, चार कर्मचारी निलंबित
महंत नरेंद्र गिरी यांना झेड दर्जाची सुरक्षा होती. सुरक्षेत हयगय केल्याप्रकरणी बुधवारी त्यांच्या चार सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. नरेंद्र गिरींचे सशस्त्र सुरक्षा रक्षक अजयसिंह यांचीही चौकशी करण्यात आली. आनंदने नरेंद्र गिरीवर सुरक्षा रक्षकाला आर्थिक लाभ दिल्याचा आरोप केला होता.

बातम्या आणखी आहेत...