आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Accused Arshdeep Singh Is A Student Of MA I Police Engaged In Investigation I Latest News And Update  

पंजाब विद्यापीठातील विद्यार्थ्याला टेरर फंडिंग प्रकरणी अटक:गँगस्टर लॉरेन्स, लखबीर लांडांचा होता सहकारी; बँक डिटेलवरून पकडले

चंदीगड9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाब विद्यापीठातील एका विद्यार्थ्याला टेरर फंडिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अर्शदीप सिंग असे आरोपीचे नाव आहे. तो मूळ भवानीगड, संगरूर येथील रहिवासी आहे. तर पंजाब विद्यापीठातून तो M.A. चे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आरोपीला पंजाबच्या विशेष ऑपरेशन सेलने चंदीगडातून अटक केली.

आरोपी हा गुंडांचा साथीदार
SSOCला तपासात आढळून आले की, आरोपी अर्शदीप सिंग हा गँगस्टर लखबीर लांडा आणि लॉरेन्स टोळीचा सदस्य असलेल्या गोल्डी ब्रारचा साथीदार आहे. आरोपीचा संबंध आणखी कोणाकोणांशी जोडलेले आहे. तो कोणता कट रचण्याचा प्रयत्न करत होता. याचा शोध घेण्याचा प्रयत्न सद्या तपास यंत्रणा करत आहे.

गँगस्टर लॉरेन्सचा फोटो
गँगस्टर लॉरेन्सचा फोटो

ISIच्या कार्यकर्त्यांनी अर्शदीपच्या खात्यात पैसे जमा केले
आयएसआयच्या कार्यकर्त्यांकडून अर्शदीप सिंगच्या बँक खात्यात पैसे जमा होत असल्याचे तपास यंत्रणेला आढळून आले आहे. त्याच्या बँक खात्याच्या माहितीच्या आधारेच त्याला अटक करण्यात आली आहे. मूळचा पंजाबचा असलेला अर्शदीप दुबई, अमेरिका, फिलिपाइन्स, इटली आणि अमेरिकेत राहून ISIसाठी टेरर फंडिंग आणि शस्त्रास्त्र पुरवठ्यासाठी काम करणाऱ्या स्लीपर सेलच्या माध्यमातून आरोपींना टेरर फंडिंग केले जात होते.

आरोपींना तीन दिवसांची कोठडी

आरोपींची चौकशी करण्यासाठी एसएसओसीने कोर्टाकडून 3 दिवसांची कोठडी मिळवली आहे. आगामी तपासात आरोपी अर्शदीप सिंगच्या खात्यात आतापर्यंत एकूण किती निधी आला. ही रक्कम कोठे व कोणत्या कामासाठी वापरली गेली, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपी गोल्डी ब्रार आणि लखबीर लांडा या गुंडांच्या अनेक दिवसांपासून संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे.

गोल्डी ब्रारने घेतली सिद्धू मुसेवाला हत्येची जबाबदारी
आरोपी लखबीर सिंग लांडा हा पंजाबच्या मोहाली जिल्ह्यातील गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर झालेल्या आरपीजी हल्ल्यातील मुख्य आरोपी आहे. तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्सचा साथीदार गोल्डी ब्रार कॅनडामध्ये आहे. यापूर्वी पंजाबमध्ये झालेल्या खुनाच्या घटनांचीही त्याने जबाबदारी घेतली आहे. गोल्डी ब्रारने सोशल मीडियावर प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवाला हत्या प्रकरणाची जबाबदारी घेतली होती. या हत्याकांडाला त्यांनी विकी मिड्डूखेडा यांच्या हत्येचा बदला म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...