आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
26 जानेवारीला दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचने धर्मेन्द्र सिंह हरमन नावाच्या व्यक्तीला अठक केली आहे. हरमनवर लाल किल्यात हिंसा करणाऱ्यांना भडकवण्याचा आरोप आहे. हरमन आपल्या कारवर चढून घोषणाबाजी करत लाल किल्यात घुसला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आणि त्या आधारे त्याला अटक करण्यात आले आहे. दरम्यान, हरमन शाहीन बागमध्ये झालेल्या आंदोलनाती सक्रिय असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
गाजीपुरला गेलेल्या विरोधी नेत्यांना पोलिसांनी अडवले
कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 71 वा दिवस आहे. परंतु, ना शेतकरी मागे हटायला तयार आहेत, ना केंद्र सरकार कायदे परत घ्यायला तयार आहे. दरम्यान, आज गाजीपूर बॉर्डरवर हालचाली वाढलेल्या दिसल्या. शिरोमणी अकाली दलचा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिरत कौर बादल आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेसह 10 विरोधी पक्षातील 15 नेते आज शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गाजीपूर बॉर्डरकडे जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले. यानंतर सर्व नेत्यांना शेतकऱ्यांची भेट घेतल्याशिवाय माघारी परतावे लागले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.