आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीचे मंत्री राजेंद्र यांच्याविरोधात तक्रार:आपच्या मंत्र्यांवर धर्मांतराचा आरोप; हकालपट्टीची मागणी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री राजेंद्रपाल गौतम यांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी शुक्रवारी भाजपच्या दिल्ली शाखेने केली आहे. दिल्लीत सामाजिक कल्याण मंत्री गौतम यांनी हिंदू देवी-देवतांचा अपमान केला आहे. या प्रकरणात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता म्हणाले, विजयादशमीमध्ये करोलबाग येथील कार्यक्रमात गौतम यांनी हजारो लोकांच्या उपस्थितीत हिंदू देवी-देवतांचा अपमान केला. हिंदू देवी-देवतांचा अपमान करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नाही. केजरीवाल सरकारने गौतम यांची तत्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी आमची मागणी आहे. पश्चिम दिल्लीचे खासदार प्रवेश वर्मा यांनी राजेंद्र पाल धर्मांतर प्रकरणात सामील असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात राजेंद्र पाल म्हणाले, भाजप राष्ट्रविरोधी आहे.

बातम्या आणखी आहेत...