आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराहुल गांधी यांच्या विरोधात कॉपीराइट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. KGF-2 ची म्युझिक लेबल कंपनी MTR ने ही केस दाखल केली आहे. भारत जोडो यात्रेच्या प्रमोशनमध्ये राहुल यांनी KGF-2 चे गाणे वापरले आहे. ''समुंदर में लहर उठी है, ज़िद्दी ज़िद्दी है तूफ़ान चट्टानें भी काँप रही है, ज़िद्दी ज़िद्दी है तूफ़ान..." हे गाणे वापरले असल्याचा कंपनीचा आरोप आहे. त्यासाठी त्यांच्याकडून परवानगी घेण्यात आलेली नाही.
म्युझिक कंपनी MTR यांचे म्हणणे आहे की, KGF 2 च्या हिंदी आवृत्तीचे हक्क मिळवण्यासाठी कंपनीने निर्मात्यांना मोठी रक्कम दिली होती. परंतु काँग्रेसने राजकीय अजेंडा आणि मार्केटिंगच्या उद्देशाने कोणताही परवाना न घेता भारत जोडो यात्रा मोहिमेत साउंडट्रॅकचा वापर केला.
राहुल गांधीसह कॉंग्रेसच्या दोन नेत्यांवर गुन्हा
एमटीआर म्युझिकचे व्यावसायिक भागीदार एम नवीन कुमार यांच्या तक्रारीवरून बंगळुरूच्या यशवंतपूर पोलिस ठाण्यात राहुल गांधी, राज्यसभा खासदार जयराम रमेश आणि काँग्रेसच्या सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या अध्यक्षा सुप्रिया श्रीनेट यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कलमांतर्गत FIR दाखल
राहुल गांधी, जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनेट यांच्याविरुद्ध कलम 403 (मालमत्तेचा अप्रामाणिक गैरवापर), 465 (खोटा वापर करणे), 120B (गुन्हेगारी कट) आणि कॉपीराइट कायदा 1957 च्या 63 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉपीराइट कायद्यानुसार 3 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो
अभिनेत्रीचा हात धरला, भाजपने राहुल गांधींना घेरले
भारत जोडो यात्रेतील तमिळ-तेलुगू चित्रपट अभिनेत्री पूनम कौर आणि राहुल गांधी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये दोघेही एकमेकांचा हात धरताना दिसले. हा फोटो पोस्ट करत कर्नाटकच्या भाजप नेत्या प्रीती गांधी यांनी लिहिले होते की, पणजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून !
त्याला अभिनेत्री पूनम कौरनेही चोख प्रत्युत्तर दिले. प्रीती गांधींची पोस्ट री-ट्विट करत पूनम कौरने लिहिले - खरच तुम्ही अपमान करत आहात. लक्षात ठेवा, पंतप्रधान नारी शक्तीबद्दल बोलतात. मी घसरलो होते तेव्हा मी पडत होते. त्याचवेळी मला राहूल सरांनी माझा हात धरून आधार दिला. तर राहुल गांधींचे आभार देखील पूनन कौरने मानले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.