आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझारखंडच्या सम्मेद शिखरजीला आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून जाहीर केल्याच्या निर्णयावरून देशभर आंदाेलन केले जात आहे. सरकारच्या निर्णयास जैन समुदायासह संत, मुनी, आचार्यांनी विराेध दर्शवला.यादरम्यान आचार्य प्रसन्नसागरजी यांची माैन साधना पूर्ण हाेईल. ५५७ दिवसांनंतर ते २८ जानेवारीला माैनव्रत साेडतील. मधुबन येथे २८ जाने. ते ३ फेब्रुवारीदरम्यान महापारणा व महाप्रतिष्ठा महाेत्सव होणार आहे. महाेत्सवाचे सचिव आकाश जैन म्हणाले, महोत्सवात सुमारे २ लाख जैन भाविक तसेच राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू महाेत्सवात सहभागी हाेतील.
गिनीज बुकमध्ये आचार्यांच्या नावाची नाेंद
आचार्य प्रसन्न सागर यांनी सम्मेद शिखरजीच्या स्वर्णभद्र कूट येथे माैन साधनेला सुरुवात केली. ५५७ दिवसांत आचार्यांनी ४९६ दिवस निर्जला उपवास केला. ते १९८८ पासून साधना व उपवास करतात. त्यांनी जयपूरच्या पद्मपुरा येथे सिंह निशक्ती व्रतामध्ये ८० दिवस आणि पुन्हा १८६ दिवसांची माैन साधना केली. त्या आधी त्यांनी दाेन वेळा सिंह निष्क्रीडित व्रत केले आहे. त्यांचेे नाव इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड्स, आशिया बुक ऑफ रेकाॅर्ड, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नाेंदवण्यात आलेले आहे. त्यांच्या नावावर ३४ विक्रम आहेत. आचार्य प्रसन्न सागर यांचे नाव दिलीप जैन आहे.
राजकीय लाभासाठी तीर्थक्षेत्रांना पर्यटनस्थळ करणे चुकीचे : विद्यासागर
भरत सिसाेदिया, जयपूर । सम्मेद शिखरला पर्यटन स्थळ करण्याच्या विराेधात जयपूरमध्ये जैन मुनी सुज्ञेय महाराजांनी देहत्याग केला. याबाबत आचार्य विद्यासागर महाराज भास्करला म्हणाले, पवित्र तीर्थस्थळांना राजकीय लाभासाठी पर्यटन स्थळ करणे चुकीचे आहे. एका मुनीने अगाध आस्था ठेवून तीर्थ रक्षणासाठी आपल्या देहाची देखील पर्वा केली नाही. सरकारने वेळीच सर्व तीर्थ क्षेत्रांना तत्काळ पवित्र क्षेत्र म्हणून जाहीर करायला हवे. जनहितामध्ये हेच याेग्य राहील. पाप टाळा. इतिहास पवित्रतेचा असताे. पर्यटनाचा नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.