आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड स्टार सोनू सूदवर पंजाबमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने त्याची कार जप्त करून ती पोलिस ठाण्यात बंद केली आहे. यानंतर त्याला घरीच राहण्यास सांगण्यात आले आहे. मतदानादरम्यान बूथ आणि शहरात फिरून मतदारांवर प्रभाव टाकल्याचा सोनू सूदवर आरोप आहे.
सूद याची बहीण मालविका सूद काँग्रेसच्या तिकिटावर मोगा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. सोनू सूद याने मोगा जागेवर मते खरेदी केली जात असल्याचा आरोप केला आहे. निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणीही सूदने केली.
अकाली दलाने केली तक्रार
मोगा येथील अकाली दलाच्या उमेदवाराच्या पोलिंग एजंटने सोनू सूद मतदारांवर प्रभाव टाकत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. याची माहिती मिळताच निवडणूक आयोगाच्या पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला. ज्यामध्ये आरोपांची प्राथमिक पुष्टी झाल्यानंतर आयोगाच्या पथकाने त्याना वाटेत अडवले आणि त्याची कार जप्त करून त्याला दुसऱ्या वाहनात घरी पाठवण्यात आले.
SSP कडून मागवला अहवाल
सोनू सूदच्या प्रकरणी आता मोगाचे जिल्हा निवडणूक अधिकारी डीसी हरीश नय्यर यांनी एसएसपीकडून अहवाल मागवला आहे. सोनू सूद खरोखरच मतदारांवर प्रभाव टाकत असल्याची खात्री पटल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते.
सूद म्हणाले - मी समर्थकांकडून अहवाल घेतोय
या प्रकरणी सोनू सूद याने आपण मतदारांवर कुठेही प्रभाव टाकत नसल्याचे स्पष्ट केले. ते केवळ समर्थकांकडून अहवाल घेत होते. सूद वेगवेगळ्या बूथवर जाऊन मतदारांच्या भेटी घेत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.