आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Action In Jharkhand, NIA Detains Social Activist Father Stan Swamy From His Namkum Bagaicha Residence

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीमा-कोरेगाव प्रकरणी मोठी कारवाई:भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेची मोठी कारवाई,  फादर स्टॅन स्वामी यांना झारखंडमधून अटक

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या प्रकरणात एनआयए दोन महिन्यांपूर्वी 6 ऑगस्ट रोजी फादर स्टॅन स्वामी यांच्या घरी पोहोचले होते

भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या कटात सामील असल्याच्या आरोपाखाली सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) यांना झारखंडमधील नामकुम बगईचा येथील निवासस्थानावरून ताब्यात घेतले. यावर्षी जानेवारीत एनआयएने हे प्रकरण घेतले. ऑगस्टमध्ये प्रथमच फादर स्टॅन स्वामी यांच्यावरही चौकशी केली गेली. स्वत: चे मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून वर्णन करणाऱ्या फादर स्टॅन स्वामी यांच्यावर आरोप आहे की, त्यांच्या आणि त्यांच्या साथिदारांच्या भाषणानंतरच 1 जानेवारी 2018 मध्ये भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार भडकला होता.

या प्रकरणात एनआयए दोन महिन्यांपूर्वी 6 ऑगस्ट रोजी फादर स्टॅन स्वामी यांच्या घरी पोहोचले होते आणि त्यांच्या निवासस्थानी सुमारे अडीच तास तपास करत चौकशी केली होती. या संदर्भात एनआयएपूर्वी महाराष्ट्र पोलिस संशोधन करत होते. यापूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी देखील दोनदा फादर स्टॅन स्वामी यांची चौकशी केली आहे. महाराष्ट्र पोलिस 28 ऑगस्ट 2018 रोजी प्रथम त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते.

दरम्यायन स्वामी यांना शुक्रवारी एनआयए न्यायालयासमोर हजर केले जाऊ शकते. फादर स्टेन स्वामी यांना रिमांडवर घेतले जाण्याची शक्यता आहे किंवा ट्रान्झिट रिमांडवर त्यांना दिल्लीला आणले जाऊ शकते. ते मूळचे केरळचे रहिवासी आहेत. यापूर्वीही स्वामींची एनआयएकडून चौकशी करण्यात आली होती. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांची चौकशी करण्यात आली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser