आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तर प्रदेश:पुष्पगुच्छ फेकणाऱ्या महिला काँग्रेस नेत्यास कार्यकर्त्यांची मारहाण, उत्तर प्रदेशात तिकीट वाटपात दे दणादण

देवरिया4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातीत रिक्त विधानसभा जागांवर पुढील महिन्यात पाेटनिवडणूक हाेऊ घातली आहे. परंतु, देवरिया येथे काँग्रेस कार्यालयात तिकीट वाटपावरून जाेरदार हाणामारी झाली. एका महिला नेत्याने तिकिटाच्या मागणीवरून सहप्रभारी यांच्यावर पुष्पगुच्छ फेकला आणि थापड लगावली. तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महिला नेत्यास बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. महिला नेत्याचे नाव तारा यादव असे सांगण्यात आले. त्यांनी काँग्रेस उमेदवार मुकुंद भास्कर व मणी त्रिपाठी यांना उमेदवारी देण्यास विराेध केला. पक्षाने चुकीच्या व्यक्तीला तिकीट दिले आहे. कारण ते अत्याचारातील आराेपी आहेत, असा दावा त्यांनी केला. त्याचबराेबर अशा उमेदवारीमुळे समाजात पक्षाची प्रतिमा मलिन हाेते, असे त्यांचे म्हणणे हाेते. घटना टाऊन हाॅल येथील कार्यालयात घडली.

महिला नेत्याने राष्ट्रीय सचिव व सहप्रभारी सचिन नायक यांच्यावर गुलदस्ता फेकला. दरम्यान, घटनाक्रमानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी तपास समितीची स्थापना केली. समिती तीन दिवस चाैकशी करून अहवाल सादर करेल. तूर्त पक्षाने दाेन कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांत राजकीय क्षेत्र अनेक कारणांनी चर्चेत आहे.

आराेपींना अटक करा : महिला आयाेग आराेपींना तत्काळ अटक करण्यात यावी, असे राष्ट्रीय महिला आयाेगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी रविवारी सांगितले. मानसिकदृष्ट्या आजारी असलेले लाेक राजकारणात कसे येतात? पाेलिस महासंचालकांनी आराेपींना अटक करावी.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser