आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाटणा:नाना पाटेकरांनी घेतली सुशांतसिंग राजपूतच्या कुटुंबियांची भेट, वडिलांना भेटल्यानंतर झाले भावूक

पाटणाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाना यांनी सुशांतच्या वडिलांचे सांत्वन केले आणि धीर दिला
  • नाना म्हणाले -सुशांत एक चांगला माणूस होता, त्याला नक्की न्याय मिळले

अभिनेता नाना पाटेकर आज सुशांत सिंह राजपूतच्या घरी पोहचले. सुशांतच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर नाना पाटेकर भावुक झाले. त्यांनी सुशांतचे वडील कृष्णा कुमार सिंह यांचे सांत्वन केले आणि त्यांना संयम ठेवण्यास सांगितला. नाना म्हणाले की, सुशांत एक चांगल्या मनाचा व्यक्ती होता. त्याला नक्कीच न्याय मिळेल. सुशांतच्या अचानक निघून जाण्याने संपूर्ण दुःखी आहे. 

नाना पाटेकर दोन दिवासांच्या बिहार दौऱ्यावर आहेत. ते एका एनजीओ कार्यक्रमात मोकामा येथे गेले होते. यानंतर ते पाटणा येथे गेले. येथे सुशांत सिंह राजपूतच्या घरी जाऊन त्यांनी कुटुंबियांची भेट घेतली आणि हिंमत दिली. 14 जून रोजी सुशांतने मुंबईतील आपल्या फ्लॅटमध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. शनिवारी सुशांतची तेरावे होते, पाटणा येथील घरी तो कार्यक्रम संपन्न झाला. सुशांतच्या आत्महत्येचा मुंबई पोलिस तपास करत आहे. 

सुशांतच्या मृत्यूनंतर अभिनेते आणि नेते त्याच्या घरी ये-जा सुरू आहे. नुकतेच भोजपुरी गायक आणि भाजपचे खासदार मनोज तिवारी, खेसारीलाल यादव, अक्षरा सिंहही सुशांतच्या घरी पोहोचले होते. उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीही सुशांतच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

बातम्या आणखी आहेत...