आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:अभिनेते परेश रावल यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध अभिनेते आणि भाजपचे माजी खासदार परेश रावल यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या (एनएसडी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. परेश रावल पुढील चार वर्षे एनएसडीचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील.

एनएसडीने ट्वीट करत माहिती दिली की, "आम्हाला सांगताना आनंद होतोय की, राष्ट्रपतींनी परेश रावल यांची एनएसडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. एनएसडी कुटुंब त्यांचे स्वागत करत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसडी नवीन उंची गाठेल."

1984-85 मध्ये केली होती करिअरची सुरुवात

परेश रावल यांच्या फिल्मी करियरची सुरुवात 1984 मध्ये आलेल्या 'होली' चित्रपटातून झाली होती. यानंतर 1985 मध्ये आलेल्या 'अर्जुन'मध्येही ते दिसले होते. परेश रावल यांना 1993 मध्ये 'सर' आणि 1994 मध्ये 'वो छोकरी'साठी बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच, त्यांना चित्रपटातील कामामुळे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...