आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Actor,Kolkata,ModiRally,West Bengal ,Actor Mithun Chakraborty May Joins BJP, PM Modi In Kolkata, PM Modi Rally In West Bengal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पश्चिम बंगाल विधानसभा 2021:माेदींच्या मेगाशाेमध्ये उतरतील रुपेरी तारे; मिथुन, प्रसेनजित यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालच्या राजधानीतील एेतिहासिक ब्रिगेड परेड मैदानात रविवारी हाेऊ घातलेल्या पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या जाहीर सभेत भाजप दीदींच्या विराेधात राजकीय मेगाशाे करण्यासाठी तयारीला लागले आहे. माेदींच्या मंचावर बंगाली चित्रपट ताऱ्यांना गाेळा करून माेठा चेहरा नसल्याच्या प्रचाराची धार कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसताे. अलीकडेच संघप्रमुख माेहन भागवत यांनी अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली हाेती. त्यामुळे मिथुन यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जाताे. क्रिकेटचे दादा गांगुली यांनाही साेबत घेण्यासाठी भाजपने जाेर लावला आहे. यासंबंधी गांगुली यांनी एका वाहिनीला प्रतिक्रिया दिली. ‘सोबई सोब किछुर जोन्यो होय ना।’ म्हणजे प्रत्येक जण प्रत्येक भूमिकेसाठी बनलेला नसताे. बांगला अभिनेता प्रसेनजितदेखील भाजपमध्ये सहभागी हाेण्याची चर्चा आहे. ब्रिगेड परेड मैदानात रविवारच्या सभेत १० लाख लाेक जमतील, यासाठी भाजप तयारीला लागले आहे. त्यासाठी भाजपचे नेते घराेघर जाऊन लाेकांना आमंत्रण देत आहेत. बंगालमध्ये लाेकप्रिय चेहरा नसल्याने भाजपसमाेर समस्या आहे. ममता बॅनर्जी भाजपच्या याच कमकुवत मुद्द्याचा फायदा घेऊन सातत्याने हल्लाबाेल करत आहेत.

गुजरात किंवा दिल्लीहून कुणीही बंगालला चालवू शकत नाही. गांगुली व मिथुनसारखे तारे भाजपमध्ये आल्यास भाजपला बंगाली चेहरा मिळेल. रवींद्र भारती विद्यापीठाचे प्राेफेसर व निवडणूक विश्लेषक डाॅ. विश्वनाथ चक्रवर्ती म्हणाले, गांगुली भाजपमध्ये सामील झाल्यास पक्षाला लाभ हाेऊ शकताे. परंतु भाजपचे बहुतांश नेते ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत आहेत. भाजपने सुशासनाचा मुद्दा मांडला तर जास्त लाभ हाेऊ शकताे. मिथुनने भाजपमध्ये प्रवेश केल्यास बंगाल व भाजपसाठी ही चांगली गाेष्ट ठरेल, असे प्रदेश उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांनी सांगितले. मिथुनला २०१४ मध्ये तृणमूल प्रमुख ममता बॅनर्जी यांनी राज्यसभेवर पाठवले हाेते. परंतु मिथुन यांनी २०१४ मध्ये राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला हाेता.

मैदान जिंकले तर विजय निश्चित
पंतप्रधानांची सभा हाेणाऱ्या ब्रिगेड परेड मैदानाबद्दल बंगालमध्ये एक गाेष्ट सांगितली जाते. हे मैदान जिंकणारे बंगाल जिंकतात, असे मैदानाबद्दल बाेलले जाते. प्लासी युद्धातील विजयानंतर ईस्ट इंडिया कंपनीने हे मैदान बनवले. स्वातंत्र्यानंतर राजकीय पक्षांनी त्यास शक्तिप्रदर्शनाचे केंद्र बनवले. राजकीय सभेची सुरुवात १९१९ मध्ये देशबंधू चित्तरंजन दासगुप्त यांच्या राैलेक्ट अॅक्टविराेधातील सभेने झाली.

बातम्या आणखी आहेत...