आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Actress Kangana Ranaut Targeted Mahatma Gandhi And Pandit Jawaharlal Nehru On Sardar Vallabhbhai Patel 145th Birth Anniversary

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगनाच्या निशाण्यावर गांधी-नेहरू:अभिनेत्री म्हणाली - सरदार पटेल पंतप्रधान होऊ शकले नाही, कारण गांधीजींना नेहरू सारखा कमकुवत मेंदू हवा होता

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री कंगना रनौटने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली. यासोबतच तिने महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी टिपण्णी केली. सरदार पटेल यांनी सोडलेल्या पंतप्रधान पदाबद्दल कंगनाने गांधीजींना दोष दिला. त्याचबरोबर स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधानपदासाठी पटेल यांनी केलेल्या तडजोडीबद्दल खेद व्यक्त केला. यावेळी कंगनाने तीन ट्विट केले.

पहिले ट्विट- गांधीजींमुळे पटेल पंतप्रधान झाले नाहीत

कंगनाने पहिल्या ट्विटमध्ये लिहिले की, "गांधीजींच्या आनंदासाठी त्यांनी पहिले पंतप्रधान म्हणून सर्वात पात्र आणि निवडलेले पद नाकारले. कारण गांधीजींना वाटत होते की, नेहरू चांगली इंग्रजी बोलतात. सरदार पटेल यांचे काहीच नुकसान झाले नाही, मात्र देशाला अनेक दशके याचा परिणाम भोगावा लागला आपल्यासाठी जे योग्य आहे ते निर्लज्जपणे हिसकावून घ्यावे."

दुसरे ट्विट- गांधीजींना कमकुवत डोके हवे होते

कंगनाने दुसऱ्या ट्विटमध्ये सरदार पटेल यांना खरे लोहपुरुष सांगत लिहिले की "माझ्या मते गांधीजींना नेहरूंसारखा कमकुवत मेंदू हवा होता. जेणेकरून ते स्वतः देशाला कंट्रोल आणि चालवू शकतील. ही योजना चांगली होती. मात्र गांधीजींच्या हत्येनंतर जे घडले ती आपत्ती होती."

तिसरे ट्विट - तुमच्या निर्णयाबद्दल खेद वाटतो

"भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली. आपणच आजचा अखंड भारत देणारी व्यक्ती आहात. पण पंतप्रधानपदाशी तडजोड करून तुम्ही तुमचे नेतृत्व व दृष्टिकोन आमच्यापासून दूर घेऊन गेले. आपल्या निर्णयाबद्दल आम्हाला खेद वाटतो."