आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाची अर्थव्यवस्था बळकट आहे. त्यावर अदानी एंटरप्रायझेस वादाचा काहीही परिणाम होणार नाही. परदेशी गुंतवणूकदार व एफपीआे यांची ये-जा सुरूच असते. अदानी समूहाचा एफपीआे रद्द झाल्याने देशाच्या प्रतिमेवर काही परिणाम झाला नसल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे. भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ (सेबी) म्हणाले, गेल्या आठवड्यात एका उद्योग समूहाच्या समभागांमध्ये चढ- उतार पाहायला मिळाले, परंतु अशा स्थितीवर निगराणी करणारी व्यवस्था आहे.
सुनियोजित हल्ला : संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘ऑर्गनायझर’ ने हिंडेनबर्गचा अहवाल म्हणजे ‘सुनियोजित व समन्वयित हल्ला’ असे म्हटले आहे. अदानींवरील हल्ल्यामागे ऑस्ट्रेलिया व भारतातील काही एनजीआे आणि भारतातील डाव्या विचारांनी प्रभावित पत्रकार जबाबदार असल्याचा दावाही यातून करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.