आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अदानी समूहाचा 20 हजार कोटी रु.चा एफपीओ मागे:गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी निर्णय : अदानी

अहमदाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अदानी समूहाने पूर्ण सबस्क्राइब झालेला २० हजार कोटींचा एफपीओ( फॉलोऑन ऑफर) मागे घेतला आहे. अदानी एंटरप्रायझेस लि.च्या(एईएल) संचालक मंडळाची बुधवारी बैठक झाली.तीत हा निर्णय झाला. अभूतपूर्व परिस्थिती आणि शेअर बाजारातील पडझडीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांचे हित डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याचे अदानी समूहाने म्हटले आहे.

अदानी एंटरप्रायझेस लि.चे प्रमुख गौतम अदानी म्हणाले, आमच्या एफपीओला पाठिंबा देणाऱ्या आणि कटिबद्ध राहणाऱ्या सर्व गुंतवणूकदारांचे संचालक मंडळाने आभार मानले. एफपीओ सबस्क्रिप्शन मंगळवारी बंद झाले. गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारात चढ-उतार सुरू असूनही कंपनीचा व्यवसाय आणि व्यवस्थापनावर विश्वास टाकल्याबद्दल कंपनी आपली आभारी आहे.

‘बुधवारी बाजारात चढ-उतार झाले. आमच्या समभागांच्या किमती दिवसभर कमी-जास्त होत होत्या. अशा अभूतपूर्व परिस्थितीत एफपीओ सुरू ठेवणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही, असे संचालक मंडळाचे म्हणणे होते. गुंतवणूकदारांना आर्थिक फटका बसू नये त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य आहे. गंुतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी बुक रनिंग लीड मॅनेजरसोबत काम सुरू आहे. आपल्या खात्यात ब्लॉक करण्यात आलेली रक्कम लवकरच मुक्त होईल. भक्कम वित्तप्रवाह आणि सुरक्षित सांपत्तिक स्थितीमुळे आमची बॅलन्सशीट उत्तम आहे. भविष्यातील योजनांवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास अदानी यांनी व्यक्त केला.

अंबानींची संपत्ती ६.८४ लाख कोटी, सर्वात धनाढ्य भारतीय
मुंबई | शेअर बाजारातील पडझडीनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी पुन्हा सर्वात धनाढ्य भारतीय बनले आहेत. फोर्ब्ज अब्जाधीशांच्या यादीत अंबानी जगातील नवव्या क्रमांकाचे धनाढ्य उद्योगपती बनले आहेत. अंबानींची संपत्ती ६.८४ कोटी झाली आहे, तर गौतम अदानींची संपत्ती घटून ६.१४ लाख कोटी झाली आहे. ते १५ व्या स्थानी आहेत.

बातम्या आणखी आहेत...