आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अदानी ग्रुपला दणका:अमेरिकेच्या बाजाराने अदानी पोर्ट्सला निर्देशांकातून वगळले, म्यानमार सैन्याशी व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • म्यानमारमधील यांगोनमध्ये एक पोर्ट बनवत आहे अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन
  • सैन्याशी संलग्न असलेल्या म्यानमार इकोनॉमिक कॉर्पोरेशनने बंदरासाठी जमीन भाड्याने दिली आहे

अदानी ग्रुप कंपनीच्या अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) ला S&P डाउ जोंसने मोठा धक्का दिला आहे. S&P ने आपल्या टिकाव निर्देशांकातून APSEZ ला वगळले आहे. अदानी पोर्ट्सचा म्यानमारच्या सैन्याशी व्यावसायिक संबंध असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे S&P डाउ जोंसने सांगितले.

अदानी पोर्ट म्यानमारच्या यांगूनमध्ये बंदर बनवत आहे
APSEZ ही अदानी समूहाची कंपनी म्यानमारमधील यॅंगून येथे बंदर बनवत आहे. या बंदराची किंमत सुमारे 290 मिलियन डॉलर्स, 2100 कोटी रुपये आहे. या बंदरासाठी म्यानमार इकोनॉमिक कॉर्पोरेशनने (MEC) जमीन दिली आहे. म्यानमार इकोनॉमिक कॉर्पोरेशनला तेथील लष्कराचा पाठिंबा आहे.

म्यानमार सैन्यावर मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप आहे
म्यानमारच्या सैन्याने 1 फेब्रुवारी रोजी सैन्य सत्तापालट केले होती. यामुळेच तेथे सैन्यविरोधी निदर्शने होत आहेत. या निदर्शनांमध्ये म्यानमारमधील 700 हून अधिक लोक मरण पावले आहेत. अमेरिकेसह अनेक देश आणि मानवाधिकार कार्यकर्ते म्यानमारच्या सैन्यावर मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत आहेत. सैन्याने सत्तापालटच्या माध्यमातून जनतेद्वारे निवडण्यात आलेले आंग सांग सूच्या सरकारला सत्तेतून बेदखल केले आहे.

सर्व स्टेक होल्डर्ससोबत चर्चा करत आहे कंपनी
म्यांमारच्या सैन्यावर मानवधिकार उल्लंघनाच्या आरोपानंतर अदानी पोर्ट्स सतर्क झाले आहे. अदानी पोर्ट्सने गेल्या महिन्यात म्हटले होते की, ते या प्रोजेक्टविषयी सर्व संबंधित एजेंसी आणि स्टेक होल्डर्ससोबत चर्चा करत आहे.

अमेरिका-ब्रिटेनने मार्चमध्ये म्यांमारच्या सैन्यासंबंधीत कंपन्यांवर प्रतिबंद लावले होते. बायडेन प्रशासनाने ज्या कंपन्यांवर प्रतिबंध लावले आहेत, त्यामध्ये म्यांमार इकॉनॉमिक कॉरपोरेशन आणि म्यांमार इकॉनॉमिक होल्डिंग पब्लिक कंपनी लिमिटेड (MEHL)आणि एक सरकारी जेम्स कंपनीचा समावेश आहे. या कंपनीचे नाव समोर येऊ शकलेले नाही. अमेरिकेच्या ट्रेजरी डिपार्टमेंट ऑफिस ऑफ फॉरेन असेट्स कंट्रोलने 15 मार्चला प्रतिबंध लावण्याचा आदेश जारी केला होता.

जापानच्या कंपनीने MEHL सोबतची भागीदारी मोडली
म्यांमारमध्ये सैन्याचा विरोध वाढल्यानंतर जापानची दिग्गज ड्रिंक कंपनी किरिन होल्डिंग्सने फेब्रुवारीमध्ये MEHL सोबत भागीदारी मोडली होती. तर दक्षिण कोरियाच्या स्टील निर्माता कंपनी POSCO देखील MEHL सोबतचे संबंध मोडण्याच्या दिशेने पुढे सरसावली. POSCO अशा पर्यायांचा विचार करत आहे ज्याद्वारे MEHL शी संबंध तुटू शकतात.

शेअर्समध्ये 4% पेक्षा जास्त घट
S&P पी डाउ जोंसच्या कारवाईमुळे अदानी पोर्ट्सच्या शेअर्सवरही परिणाम झाला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये 4% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. दुपारी 12.24 वाजता अदानी पोर्ट्सचे शेअर्स 4.27% टक्क्यांनी घटून 712.70 रुपये प्रति युनिटवर व्यवहार करत आहेत.

सस्टेनिबिलिटी इंडेक्स काय आहे?
डाउ जोंसच्या सस्टेनिबिलिटी इंडेक्सला S&P डाउ जोंस इंडिसेज आणि रौबेको SAM (टिकाऊ मालमत्ता व्यवस्थापन) मिळून बनवतात. त्याला सतत सूचकांक देखील म्हटले जाते. या निर्देशांकात 61 उद्योगांपैकी सर्वात सस्टेनेबल कंपन्यांचा समावेश केला जातो. या इंडेक्समध्ये सामिल होणाऱ्या कंपन्यांची निवड शासन, सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रातील चांगल्या नोंदींच्या आधारे केली जाते.

बातम्या आणखी आहेत...