आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी देशात नवे वेल्थ मॅग्नेट म्हणून समोर येत आहेत. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी या वर्षी श्रीमंत भारतीयांत सर्वाधिक उत्पन्न वाढ करण्यात यशस्वी ठरले. त्यांच्या या वेगापुढे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानीही मागे पडले आहेत. एकूण संपत्तीबाबतीत अंबानी १० व्या, अदानी ४० व्या स्थानी आहेत.
ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्सनुसार, यंदा साडेदहा महिन्यांत अदानींची संपत्ती १.४१ लाख कोटींनी वाढली. म्हणजे त्यांनी संपत्तीत रोज ४४९ कोटींची भर टाकली. दुसरीकडे, मुकेश अंबानी आतापर्यंत आपल्या संपत्तीत १.२१ लाख कोटी रुपयांचीच (१६.४ अब्ज डॉलर) भर टाकू शकले. म्हणजेच अंबानींनी संपत्तीत रोज सुमारे ३८५ कोटींची भर घातली. ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्सच्या हिशेबाने संपत्तीत भर घालणाऱ्यांच्या यादीत अदानी जगात नवव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी जगातील दुसऱ्या (बिल गेट्स), ७ व्या (लॅरी पेज) व ९ व्या (स्टीव्ह बाल्मर) यांनाही मागे टाकले. सध्या अदानींची एकूण संपत्ती २.२५ लाख कोटी रु. (३०.४ अब्ज डॉलर) आहे. ते यादीत ४० व्या स्थानी आहेत. दुसरीकडे, १.२१ लाख कोटी रुपयांची भर पडल्यानंतर मुकेश अंबानींची एकूण संपत्ती ५.५५ लाख कोटी रुपये (७५ अब्ज डॉलर) झाली आहे. यादीत ते जगातील १० वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. या वर्षी जगात टेस्ला कंपनीच्या अॅलन मस्क यांनी संपत्तीत सर्वाधिक भर घातली आहे. त्यामुळे टस्क यांची संपत्ती ७.०३ लाख कोटी रु.नी (९५ अब्ज डॉलर) वाढून ती ९.१० लाख कोटी झाली आहे. यादीत अॅमेझॉनचे जेफ बेजोस १३.६१ लाख कोटी रु. (१८४ अब्ज डॉलर) संपत्तीसह पहिल्या स्थानी आहेत. अदानींनी १९८८ मध्ये वयाच्या ३२ व्या वर्षी कमोडिटी ट्रेडरच्या रूपात कारकीर्द सुरू केली होती.
चार शेअरमुळे संपत्तीत वाढ, अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर १०४९% नी वधारले
अदानींच्या कंपनीच्या चार शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाल्याने त्यांची संपत्ती वाढली आहे. हे शेअर आहेत अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एंटरप्रायजेस, अदानी गॅस आणि अदानी ट्रान्समिशन. अदानी ग्रीनचे शेअर २०२० मध्ये १०४९% नी वाढले. अदानी गॅस आणि अदानी एंटरप्रायजेसच्या शेअरमध्ये १०३% आणि ८५% ची वाढ झाली आहे. ट्रान्समिशन आणि पोर्ट््स क्रमश: ३८% व ४% नी वाढले. मात्र, अदानी पॉवरमध्ये ३८ % ची घसरण झाली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.