आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाला असून परिस्थिती गंभीर आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे भारतामध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी लोकांना भारत सरकार आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच भारताने चांगले लसीकरण केले असून आपल्याकडे ट्रॅक रेकॉर्ड आहे. त्यामुळे घाबरू नका, असे त्यांनी ट्विट करुन म्हटले.
चीनसह जगातील सर्वच देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. हाँगकाँग पोस्टच्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये कोविड-19 ची असंख्य प्रकरणे नोंदवली जात आहे. अधिकृत संख्या दिवसाला सुमारे 2,000 आहे. चीनमध्ये कोविड रुग्णांमध्ये वाढ झाल्याबद्दल माजी भारतीय मुत्सद्दी केपी फॅबियन यांनी चिंता व्यक्ती केली. चीनच्या 60 टक्क्यांहून अधिक आणि जगातील 10 टक्के लोकसंख्येला कोविडची लागण होण्याची शक्यता आहे आणि लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो. चीनमध्ये कोरोना रुग्ण वाढीवर बोलताना ते म्हणाले क, जगाची 10 टक्के लोकसंख्या म्हणजे 8 अब्ज आहे. हा आकडा खूप मोठा आहे. चीन ज्या पद्धतीने कोविडशी लढत आहे. यामध्ये काहीतरी चूक झाली आहे. त्यांची लस तेवढी प्रभावी नसावी. त्यांनी केलेले प्रयत्न हे पुरेसे नाहीत, असे ते म्हणाले.
केंद्राचा राज्यांना अलर्ट
जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील, चीन आणि अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ होत असताना भारत सरकारही सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना अलर्ट पाठवला आहे. सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना नवीन कोविड पॉझिटिव्ह रूग्णांचे नमुने INSACOG (Indian SARS-CoV-2 Genomics Consortium) लॅबमध्ये पाठवण्यास सांगितले आहे. यामुळेच विषाणूची प्रसाराची क्षमता किती आहे, याची माहिती मिळते व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य होते.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, अशा प्रकारच्या चाचण्यांमुळे देशातील कोरोना विषाणूचे कोणतेही संभाव्य नवीन प्रकार वेळेवर शोधणे शक्य होईल आणि सार्वजनिक आरोग्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास मदत होईल. जिनोम सिक्वेंसिंग ही अशी चाचणी आहे, ज्यामध्ये आरएनए रेणुचा उपयोग करून आनुवंशिक माहिती मिळविली जाते. याशिवाय या विषाणूत किती बदल झाले आहेत, तो शरीरात कसा प्रवेश करतो आणि त्याची संसर्ग क्षमता काय आहे अशी सर्व माहिती यातून मिळते. सध्या भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग बऱ्याच अंशी नियंत्रणात आहे. येथे आठवडाभरात 1200 नवीन प्रकरणे नोंदवली जात असली तरी जगभरात दर आठवड्याला कोविड-19 संसर्गाची 35 लाख नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूचा धोका अद्याप टळलेला नसून त्याबाबत दक्षता घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.