आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडीसाठी गळा चिरला:दिल्लीत मद्यधुंद व्यक्तीने दुकानावर मागितली बीडी, नकार देताच धारदार शस्त्राने चिरला गळा; घटना CCTV मध्ये कैद

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका मद्यधुंद तरुणाने बीडी न दिल्याबद्दल महिलेचा गळा कापला. त्यानतणार रुग्णालयात जखमी महिलेचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही घटना रविवारी रात्री डाबरी परिसरात घडली. आरोपी ड्रग अॅडिक्ट असल्याचे सांगितले जात आहे.

या महिलेचे नाव विभा असे समोर आहे. ती डबरी येथे राहत होती. आरोपी दिलीप हा देखील याच भागातील होता. पतीच्या व्यतिरिक्त विभाच्या कुटुंबात दोन लहान मुले आहेत. ती महिला जनरल स्टोअर चालवत होती. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आरोपी दिलीप विभा यांच्याकडे बीडीची मागणी करत होता. त्यांनी नकार दिला तेव्हा दिलीप खूप चिडला.

CCTV फुटेजमध्ये दिसत आहे की, आरोपी जनरल स्टोअरच्या बाहेर महिलेशी वाद घालत आहे. वाद वाढत असताना, त्याने आपली पिशवी खाली ठेवली, त्यानंतर चाकू बाहेर काढला. महिला घाबरली आणि रस्त्यावर आली. तो त्या महिलेच्या जवळ जातो आणि तिला पकडतो आणि तिचा गळा कापतो. ती महिला तिथे बेशुद्ध पडते.

घटनास्थळी उपस्थित लोकांनी आरोपीला मारहाण केली
गुन्हा केल्यानंतर आरोपी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला पकडले आणि मारहाण केली. जखमी महिलेला रुग्णालयात नेण्यात आले, पण तिचा जीव वाचवता आला नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...