आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Additional Charge Of Goa's Governorship To Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari

अतिरिक्त प्रभार:महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त प्रभार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मेघालयच्या राज्यपालपदी बदली

गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मेघालयच्या राज्यपालपदी बदली करण्यात आल्याने महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रासह गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त प्रभार सोपवण्यात आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बदलीच्या पत्रकावर स्वाक्षरी केली आहे. मलिक यांची एका वर्षातील तिसरी बदली आहे. यापूर्वी ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते.

मलिक यांनी 23 ऑगस्ट 2018 ला जम्मू-काश्मीरचे राज्यपाल पद सांभाळले होते. ते 30 ऑक्टोबर 2019 पर्यंत त्या पदावर होते. 3 नोव्हेंबर 2019 ला त्यांना गोवाचे राज्यपाल बनवण्यात आले. आता त्यांची मेघालयच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते

मागच्या वर्षी 5 ऑगस्टला केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केली. यादरम्यान मलिक जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. केंद्राने जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्र शासित प्रदेश बनवले, हा निर्णय 31 ऑक्टोबरपासून लागू झाला.

कोण आहेत सत्यपाल मलिक?

सत्यपाल मलिक हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. 1974 ते 1977 दरम्यान त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेत आमदारकी भूषवली. 1980 ते 86 मध्ये त्यांनी राज्यसभेवर उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. तर 1989 ते 1991 दरम्यान ते जनता दलाकडून अलिगढचे लोकसभा खासदार होते. ऑक्टोबर 2017 ते ऑगस्ट 2018 दरम्यान ते बिहारचे राज्यपाल होते.

बातम्या आणखी आहेत...