आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना लस:कोरोना लस घेणाऱ्याचे आधार लिंक केले जाईल, कोविन अॅप अनिवार्य

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाळा, पंचायत इमारती, अंगणवाडी केंद्रात पोलिओसारखे बूथ बनणार

जगाची नजर कोरोनाच्या प्रभावी लसीकडे आहे. जगभरात एकूण ७३ लसींचा परीक्षण वेगवेगळ्या टप्प्यांत सुरू आहे. त्यापैकी सहा लसींचा आणीबाणीच्या परिस्थितीत वापर सुरू झालाय. त्यात पाच प्रमुख आहेत. पाच लसी बाजारात डिसेंबर ते एप्रिलपर्यंत येण्याची शक्यता आहे. भारतात कोरोना लसीकरणासाठी सरकार कोविन अॅपची मदत घेणार आहे. लसीकरणाच्या यादीत व्यक्तीचा समावेश आधार लिंकद्वारे केला जाणार आहे. बनावट होऊ नये, असा त्यामागील उद्देश. आधार नसलेल्या लोकांसाठी काय व्यवस्था असेल, याची माहिती अद्याप नाही. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या म्हणण्यानुसार जुलै २०२१ पर्यंत प्राधान्यक्रमानुसार २५-३० कोटी भारतीयांचे लसीकरण होऊ शकते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही दिवसांपूर्वी नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल, भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रो. के. विजयराघवन व केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या बैठकीत लस येण्याआधी एखाद्या कंपनीकडून खरेदीबाबतच्या करार पद्धतींवरही चर्चा झाली. आैषधी कंपन्या सुमारे ५३० कोटी लस बनवतील. त्यापैकी २७० कोटी म्हणजे सुमारे ५१ टक्के अमेरिका, ब्रिटनसारख्या विकसित देशांना मिळतील.

शाळा, पंचायत इमारती, अंगणवाडी केंद्रात पोलिओसारखे बूथ बनणार

केंद्र सरकार लस निर्मात्यांकडून थेट खरेदी करेल. राज्य सरकार सध्या लसीकरणासाठी बूथसारखा वापर करण्याजोग्या इमारतींचा शोध घेत आहेत. शाळा, पंचायत इमारती, अंगणवाडी केंद्राच्या इमारतींचाही वापर होऊ शकतो. लसीकरणाच्या यादीत समाविष्ट व्यक्तीला आधारशी लिंक केले जाईल. त्यामुळे लसीकरण झाले किंवा नाही, हे स्पष्ट होणार आहे. देशातील सर्व जिल्ह्यांत सुमारे २८ हजार लसीकरण साठवण केंद्र आहेत. ते इविनशी जोडलेले आहेत.

परिवहनाच्या कामात सुमारे ४० हजार फ्रंटलाइन वर्कर्स आहेत. साठवण असलेल्या ठिकाणचे तापमान तपासण्यासाठी सुमारे ५० हजार तापमान लॉगर्स आहेत. आरोग्य मंत्रालयाकडे इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क (इविन) सारखा डिजिटल प्लॅटफॉर्म आधीपासूनच उपलब्ध आहे.

सरकार त्याच्या डेटाला कोविन अॅपशी संलग्न करू शकते. वास्तविक भारतात लहान मुलांच्या लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जातो. म्हणूनच देशात आधीपासूनच लस साठवणीचे नेटवर्क आधीपासून उपलब्ध आहे. परंतु, मॉडर्ना, फायजर लसींसाठी हे साठवण केंद्र कामाचे नाहीत. ऑक्सफर्ड व भारतात बनणाऱ्या लसींना सामान्य तापमानात साठवले जाऊ शकते. त्यामुळेच सरकारची त्याकडून अपेक्षा आहे.

प्रत्येक नागरिकाला कोरोना लसीकरणाची माहिती कोविन अॅपवर मिळेल, कुणाचे लसीकरण झाले किंवा नाही, हेही समजेल.

भारतात काेविन अॅपद्वारे लसींचा स्टॉक इत्यादी महत्त्वाची माहिती मिळू शकेल. लस कधी घेता येईल, ही माहिती अॅपने मिळेल. यात रिअल टाइम डेटा असेल. जाणून घेऊया या अॅपबद्दल...

> लसीकरणाचे प्रमाणपत्रही मिळेल

कोविन अॅपच्या माध्यमातून लसीकरणाचे वेळापत्रक, ठिकाण, लस कोण देणार याचे विवरणही समजू शकेल. एकदा लस दिल्यानंतर त्याचे प्रमाणपत्रही अॅपद्वारे मिळेल. त्याला डिजिलॉकरमध्येही ठेवले जाऊ शकेल.

> तापमान बदलावर निगराणी

अॅप लसीच्या साठवणीपासून आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय किंवा लसीकरण केंद्रापर्यंतच्या प्रवासावर निगराणी ठेवेल. स्टॉक संपत असल्यास त्याबाबतचे नोटिफिकेशन पाठवेल. संपूर्ण प्रवासादरम्यान अॅपद्वारे तापमानही पाहिले जाणार

> अॅपमध्ये वर्कर्स, रुग्णांचा डेटा

अॅपमध्ये फ्रंटलाइन वर्कर्स, ५० वर्षांहून जास्त वयाचे लोक व गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या लोकांचा डेटा राहील. जिल्हा स्तरावर सरकारी तसेच खासगी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांचा तपशीलही मिळेल.

बातम्या आणखी आहेत...