आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोची:व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह पोस्टसाठी अ‍ॅडमिन जबाबदार नाही : कोर्ट, केरळमध्ये अ‍ॅडमिनवर पॉस्कोअंतर्गत दाखल झाला होता गुन्हा

कोची6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये एखाद्या सदस्याने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास त्याची जबाबदारी ग्रुप अ‍ॅडमिनची नसेल. केरळ उच्च न्यायालयाने गुरुवारी याबाबत आदेश जारी केला. एका ग्रुपमध्ये एका सदस्याने मुलांशी संबंधित अश्लील पोस्ट टाकली होती. त्यामुळे अ‍ॅडमिनवर पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयाने याप्रकरणी मुंबई आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या आदेशांचा हवाला देत म्हटले की, ‘अ‍ॅडमिनचा विशेषाधिकार फक्त सदस्यांना ग्रुपमध्ये जोडण्याचा किंवा हटवण्याचा आहे. कोणता सदस्य काय पोस्ट करत आहे यावर त्याचे कुठलेही नियंत्रण नसते. तो ही पोस्ट हटवू शकत नाही आणि सेन्सॉरही करू शकत नाही. त्यामुळे ग्रुप अ‍ॅडमिनला जबाबदार ठरवता येऊ शकत नाही.’ एखाद्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपमध्ये एखादा अ‍ॅडमिन आणि इतर सदस्यांमध्ये मालक आणि नोकर, एखाद्या संस्थेचा प्रमुख व एजंट अशा प्रकारचे नाते नसते. त्यामुळे कोणत्याही आक्षेपार्ह पोस्टसाठी एखाद्या अ‍ॅडमिनला जबाबदार धरणे हे गुन्हेगारी कायद्याच्या मूलभूत तत्त्वांना छेद देणारे ठरते, असे उच्च न्यायालयाने नमूद केले.

बातम्या आणखी आहेत...