आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांचे कार्यालय विक्रीला:नरेंद्र मोदींचे वाराणसीमधील संपर्क कार्यालय विक्री असल्याची OLX वर जाहिरात

वाराणसी7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • याप्रकरणी पोलिसांकडून चौघांना अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वारासणीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंतप्रधानांचे वाराणसीतील कार्यालय विक्रीला काढल्याची जाहिरात व्हायरल झाली आहे. वस्तूंच्या खरेदी-विक्री करणाऱ्या OLX या ऑनलाईन वेबसाईटवर ही जाहिरात टाकण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी जार जणांना अटक केली आहे.

अटक केलेल्या या चौघांनी नरेंद्र मोदींच्या वाराणसीमधील कार्यालयाचा फोटो काढून OLX या वेबसाईटवर 'विकणे आहे' असे लिहून टाकले. तसेच, त्यांनी या कार्यालयाची विक्री किंमत 7.5 कोटी रुपये ठरवली. OLX वरील या जाहिरातीत मोदींच्या कार्यालयाचे आतील भागाचे फोटो, आतील खोल्या, पार्किंगची सुविधा आणि इतर अनेक गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. हे प्रकरण निदर्शनास आल्यानंतर OLX वरून ही जाहिरात हटवण्यात असून पुढील चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...