आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Advocate General Mehta And Sibal Will Also Argue On Behalf Of The Governor Today

सत्तासंघर्षावर 'सर्वोच्च' सुनावणी:शिवसेनेतील मतभेदांना फूट म्हणता येणार नाही, शिंदे गटाकडून अ‍ॅड. साळवे यांचा युक्तिवाद

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज राज्यपालांतर्फे महाधिवक्ता तुषार मेहता युक्तिवाद करतील तसेच ठाकरे गटाचे वकील सिब्बलही युक्तिवाद करतील

राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात सुरुवात झाली आहे. शिंदे गटाकडून मंगळवारी अ‍ॅड. हरीश साळवे यांनी प्रथम युक्तिवाद केला. त्यानंतर शिंदे गटाकडूनअ‍ॅड. नीरज कौल आणि अ‌ॅड. महेश जेठमलानी, अ‌ॅड. मनिंदरसिंग यांचा युक्तिवाद झाला. मंगळवारची सुनावणी संपली असून बुधवारी राज्यपालांतर्फे महाधिवक्ता तुषार मेहता युक्तिवाद करतील. तसेच ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल हेही युक्तिवाद करणार आहेत.

फुटीबाबतच्या तरतुदी लागू नाहीत : अ‌ॅड. साळवे
शिंदे गटाच्या बाजने युक्तिवाद करताना अ‌ॅड. हरीश साळवे म्हणाले, विधानसभा अध्यक्षांना घटनात्मक अधिकार असतात. त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. शिवसेनेत पक्षांतर्गत
मतभेद होते. त्याला फूट पडली, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे पक्ष फुटीबाबतच्या तरतुदी या प्रकरणात लागू होत नाहीत. खरा पक्ष कोणता, हे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

उपाध्यक्षांना कारवाईचा अधिकार नाही : जेठमलानी
अॅड. महेश जेठमलानी म्हणाले, शिवसेनेचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत दीर्घकाळ वैचारिक मतभेद राहिले. २१ जूनला हेच मतभेद प्रत्यक्ष समोर आले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना गटनेता पदावरून दूर केले. विधानसभेच्या उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांना कारवाईचा अधिकार राहत नाही, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...