आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Advocate Prashant Bhushan Contempt Case : Prashant Bhushan Fined Rs 1, If Fine Not Pay Then He Will Get 3 Months Imprisonment And 3 Years Prohibition To Practice Law

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यायालय अवमान प्रकरण:सर्वोच्च न्यायालयाने दोषी प्रशांत भूषण यांना 1 रुपया दंड ठोठावला; दंड न भरल्यास 3 महिने तुरुंगवास, 3 वर्षे वकिली करण्यास प्रतिबंध

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरिष्ठ वकील प्रशांत भूषण (फाइल फोटो) - Divya Marathi
वरिष्ठ वकील प्रशांत भूषण (फाइल फोटो)
  • भूषण यांनी ट्विटरवर म्हटले होते - मागील 6 वर्षांत माजी सरन्यायाधीशांनी लोकशाही संपुष्टात आणण्यात भूमिका निभावली

कोर्ट आणि न्यायाधीशांचा अवमान प्रकरणी सुप्रीम कोर्टाने वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांना 1 रुपया दंड ठोठावला आहे. भूषण यांनी 15 सप्टेंबरपर्यंत दंड न भरल्यास त्यांना 3 महिन्यांचा तुरुंगवास आणि 3 वर्षांसाठी वकिली करण्यात प्रतिबंध करण्यात येईल. सुप्रीम कोर्टाने म्हटले की बोलण्याचे स्वातंत्र्य दडपता येणार नाही, परंतु इतरांच्या अधिकाराचा आदर करणे देखील आवश्यक आहे.

प्रशांत भूषण यांनी माफी मागण्यास नकार दिला

सुप्रीम कोर्टाने या महिन्याच्या सुरुवातीलाच भूषण यांना महिन्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने भूषण यांना अवमान प्रकरणी दोषी ठरवले होते आणि निर्णय राखीव ठेवला होता. गेल्या आठवड्यात कोर्टाने भूषण यांना बिनशर्त माफी मागण्याची संधी दिली होती, परंतु त्यांनी नकार दिला. भूषण यांनी म्हटले होते की जर त्यांनी माफी मागितली तर ते अंतरात्मा आणि कोर्टाचा अवमान होईल.

भूषण यांच्या या 2 ट्विटला कोर्टाने अवमान मानली आहेत

पहिले ट्विट 27 जून : जेव्हा इतिहासकार भारताची शेवटची 6 वर्षे पाहतात, तेव्हा असे आढळते की देशातील लोकशाही आणीबाणीशिवाय कशी संपुष्टात आणली. ते (इतिहासकार) सुप्रीम कोर्ट विशेषतः 4 माजी सीजेआय यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करतील.

दुसरे ट्विट 29 जून : त्यात ज्येष्ठ वकिलांनी सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांचा हार्ले डेव्हिडसन बाइकसोबतचा फोटो शेअर केला. या फोटोत सीजेआय विना हेल्मेट आणि मास्कचे दिसले होते. भूषण यांनी लिहिले होते की, सीजेआय यांनी लॉकडाउनमध्ये कोर्ट बंद ठेवून लोकांना न्याय देण्यास नकार दिला आहे.

भूषण यांना यापूर्वीही अवमान केल्याची नोटीस मिळाली होती

प्रशांत भूषण यांना नोव्हेंबर 2009 मध्ये सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती. तेव्हा त्यांनी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांवर टिप्पणी केली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser