आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Afghanistan Herat Mosque Blast Updates । Taliban Religious Leader Mulla Mujib Ansari Killed | Afghanistan Taliban War

मशिदीत स्फोट, मुल्ला मुजीबचा खात्मा:14 जण ठार; तालिबानच्या मुल्लाने विरोधावर शिरच्छेदाचे काढले होते फर्मान

काबूलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी मोठा स्फोट झाला. यामध्ये तालिबानचा सर्वात मोठा धार्मिक नेता मुल्ला मुजीब उर रहमान अन्सारी मारला गेला आहे. ही घटना गाजारघ शहरात घडली. गेल्या महिन्यातही तालिबानचा एक प्रमुख नेता मारला गेला होता. या हल्ल्यामागे इसिसच्या खोरासान गटाचा हात असल्याचे मानले जात आहे. याबाबत तालिबानने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

तालिबानी मौलवी मुल्ला मुजीब उर रहमान अन्सारी शुक्रवारच्या नमाजासाठी हेरातच्या मशिदीत गेला होता. - फाइल फोटो.
तालिबानी मौलवी मुल्ला मुजीब उर रहमान अन्सारी शुक्रवारच्या नमाजासाठी हेरातच्या मशिदीत गेला होता. - फाइल फोटो.

दोन स्फोटांनी हादरली मशीद

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गाजारघच्या मशिदीमध्ये एकूण 2 स्फोट झाले. यावेळी जुम्माची नमाज चालू होती. मुल्ला मुजीब हे या मशिदीचे मुख्य इमाम होते. त्याच्या समोरील रांगेत हा स्फोट झाला. हा फिदाईन हल्ला होता आणि त्यात दोन लोक सामील असल्याचे मानले जात आहे.

लोक बाहेर पळत असताना दुसरा स्फोट झाला. काही वृत्तांनुसार, मुल्ला मुजीब हेरातमधील आर्थिक परिषदेत सहभागी झाल्यानंतर काही तासांनंतर मशिदीत पोहोचला होता. अन्सारींच्या सचिवाने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.

शिरच्छेद करण्याचे दिले होते आदेश

मुजीब हा तालिबानच्या सर्वात क्रूर नेत्यांपैकी एक मानला जात असे. मुलींच्या शिक्षणाला आणि घर सोडून जाण्यास त्याचा तीव्र विरोध होता. सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्याने फतवा काढला होता. त्यात म्हटले होते की- जर कोणी तालिबान राजवटीला विरोध केला किंवा आदेशांचे पालन केले नाही, तर त्याचा शिरच्छेद करणे हीच त्याची शिक्षा आहे. विशेष म्हणजे हा हुकूम किंवा फतवा तालिबानच्या प्रवक्त्याने मुजीबचे वैयक्तिक मत म्हणून फेटाळून लावला होता.

ISKP वर संशय का?

बुधवारी हेरातमध्येच तालिबान आणि इसिसच्या खोरासान गटामध्ये रक्तरंजित चकमक झाली. या हल्ल्यात आयएसकेपीचे 3 दहशतवादी मारले गेले होते. यानंतर खोरासान गटाने या मृत्यूंचा बदला नक्कीच घेणार असल्याचे सांगितले होते.

ISKP हा तालिबानसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे मानले जाते, ज्यांनी 15 ऑगस्ट 2021 रोजी अफगाणिस्तानचे सरकार ताब्यात घेतले. हेरातसह देशातील अनेक भागांत तालिबान आणि आयएसकेपी यांच्यात संघर्ष सुरू आहेत. अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर पडले तेव्हा काबूल विमानतळावर झालेल्या स्फोटामागे ISKPचा हात होता.

बातम्या आणखी आहेत...