आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Afghanistan Indian Air Force C 130j Transport Aircraft Took Off From Kabul With Over 85 Indians

ऑपरेशन एअरलिफ्ट:काबूलमधून 85 भारतीयांना घेऊन निघाले हवाई दलाचे विमान, आणखी 200 लोकांच्या एअरलिफ्टची तयारी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालिबान्यांनी सत्ता काबीज केल्यापासून अफगाणिस्तानमधील परिस्थिती चिंताजनक आहे. तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दरम्यान भारतीय हवाई दलाच्या C -130J विमानातून 85 भारतीय घरी परतत आहेत. रिपोर्टनुसार विमान इंधन भरण्यासाठी ताजिकिस्तानमध्ये उतरले होते. हे विमान काबूलहून दिल्लीला येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आणखी 200 लोकांना आणण्याची तयारी केली जात आहे, यासाठी हवाई दलाचे C-17 विमानही स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे.

यापूर्वी मंगळवारी सुमारे 140 लोक परत आले होते. यामध्ये भारतीय नागरिक, पत्रकार, दूतावासातील इतर कर्मचारी आणि भारतीय सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...