आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Afghanistan War Vs Taiban Update; Taliban Capture Ghazni City, Just 150 Km From Kabul

तालीबानसोबत करार:अफगाणिस्तान सरकारने सत्तेमध्ये दिली भागिदारीची ऑफर, काबूल ताब्यात घेण्यापासून तालिबान फक्त 150 किमी दूर

काबूल4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गझनी शहर ताब्यात घेतल्यानंतर तालिबान्यांनी प्रत्येक चौकात आपले लढाऊ सैनिक तैनात केले आहेत.

तालिबानी दहशतवाद्यांनी एका आठवड्यात अफगाणिस्तानची 10 राज्ये काबीज केली आहेत. आता राजधानी काबूलपासून अवघ्या 150 किमी अंतरावर असलेल्या गझनीवरही त्यांचे लक्ष आहे. म्हणजेच, तालिबान लवकरच काबूलवरही कब्जा करू शकतो आणि त्यानंतर संपूर्ण अफगाणिस्तान त्यांच्या ताब्यात येईल. दरम्यान, अफगाणिस्तान सरकारने बातचीत करण्याचा प्रयत्न केला आहे.

कतारमध्ये तालिबानशी वाटाघाटी करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनी हिंसाचार संपवण्यासाठी करार करण्याची ऑफर दिली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, अफगाणिस्तान सरकार तालिबानला सत्तेत भागीदार बनवू इच्छित आहे जेणेकरून ते देशातील युद्ध संपवू शकतील.

काबूल काबीज करण्यासाठी लागू शकतात 3 महिने

गुरुवारी तालिबानने अफगाणिस्तानच्या 10व्या राज्याची राजधानी गझनी ताब्यात घेतली. येथे कालपर्यंत राज्यपाल कार्यालय, पोलीस मुख्यालय आणि जेल सरकारच्या ताब्यात होते. आता त्यांच्यावर तालिबानी दहशतवाद्यांचे नियंत्रण आहे. गझनी आणि काबूलमधील अंतर फक्त 150 किलोमीटर आहे.

अफगाणिस्तानच्या त्या सामान्य लोकांची आशा दिवसेंदिवस तुटत चालली आहे. जे वेगवेगळ्या शहरांमधून काबूलमध्ये आले होते, या आशेने की किमान राजधानी तालिबानच्या ताब्यातून वाचली जाईल. अमेरिकेसह अनेक देशांचे संरक्षण तज्ज्ञ गृहीत धरत होते की तालिबानला काबूल ताब्यात घेण्यासाठी 3 ते 6 महिने लागू शकतात, परंतु त्यांचे दावे चुकीचे असल्याचे सिद्ध झाले.

तालिबानने 7 दिवसात 10 राज्यांची राजधानी केली काबीज

1. जरांज: अफगाणिस्तानातील एका राज्याची पहिली राजधानी होती. ज्याला तालिबानने काबीज केले आहे. 6 ऑगस्ट रोजी शहर दहशतवाद्यांनी काबीज केले.

2. शबरगान: तालिबानच्या हातात येणारी ही अफगाणिस्तान राज्याची दुसरी राजधानी होती. जरांज ताब्यात घेतल्यानंतर 24 तासांच्या आत 7 ऑगस्ट रोजी शबरगान तालिबानच्या ताब्यात आला.

3. सर-ए-पोल: 8 ऑगस्ट रोजी तालिबान्यांनी शहर काबीज केले. या राज्यात 7 जिल्हे आणि 896 गावे आहेत.

4. कुंदुज: ही उत्तर अफगाणिस्तानमधील कुंदुज राज्याची राजधानी आहे. त्याची लोकसंख्या सुमारे 4 लाख आहे. 8 ऑगस्ट रोजी तालिबान्यांनी येथे कब्जा केला.

5. तालेकान: कुंदुंज बरोबरच तालिबानने 8 ऑगस्ट रोजी तालेकान काबीज केले. ही तखर प्रांताची राजधानी आहे. 2006 मध्ये त्याची लोकसंख्या 2 लाखांच्या जवळपास होती.

6. ऐबक: ही अफगाणिस्तान राज्याची सहावी राजधानी होती, जी तालिबानच्या ताब्यात आली. दहशतवाद्यांनी 9 ऑगस्ट रोजी येथे कब्जा केला होता.

7. फराह: हे पश्चिम अफगाणिस्तानमधील सर्वात मोठे शहर आहे. त्याची सीमा इराणसोबत मिळते. 10 ऑगस्ट रोजी तालिबान्यांनी यावर कब्जा केला.

8. पुल-ए-खुमरी: हे शहर बागलाण प्रांताची राजधानी आहे. हे कुंदुजपासून 100 किलोमीटर आणि मजार-ए-शरीफपासून 200 किलोमीटर अंतरावर आहे. 10 ऑगस्ट रोजी तालिबान्यांनी ती ताब्यात घेतली.

9. फैजाबाद: अफगाणिस्तानच्या पामर क्षेत्राचे व्यावसायिक केंद्र आहे. ही बदाखशान प्रांताची राजधानी आहे. 11 ऑगस्ट रोजी तालिबानने ती ताब्यात घेतली.

10. गझनी: काबुल ते कंधार हा मार्ग या शहरातून जातो. लोकसंख्या सुमारे 2 लाख आहे. तालिबानने 12 ऑगस्ट रोजी ती ताब्यात घेतली.

बातम्या आणखी आहेत...