आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन व्हायरस:'आफ्रीकन स्वाइन फ्लू'चा भारतात शिरकाव; देशातील पहिले प्रकरण असाममध्ये, 2500 डुकरांचा मृत्यू

गुवाहाटीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
असामचे पशुपालन मंत्री अतुल बोरा यांनी रविवारी सोनपूरमधील एका पिग फार्मचे निरीक्षण केले. - Divya Marathi
असामचे पशुपालन मंत्री अतुल बोरा यांनी रविवारी सोनपूरमधील एका पिग फार्मचे निरीक्षण केले.
  • असाम सरकारचा दावा- माणसांवर या व्हायरसचाचा काहीच परिणाम होणार नाही
  • व्हायरस चीनमधून अरुणाचल प्रदेश आणि नंतर असाममध्ये आल्याची शक्यता

देशात 'आफ्रीकन स्वाइन फ्लू'चे पहिले प्रकरण असाममधून समोर आले आहे. राज्य सरकारचा दावा आहे की, तेथील 7 जिल्ह्यातील 306  गावांमध्ये रविवारपर्यंत 2,500 पेक्षा जास्त डुकरांचा मृत्यू झाला आहे. असामचे पशुपालन मंत्री अतुल बोरा म्हणाले की, केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरही डुकरांना मारण्याचा निर्णय अद्याप घेतला जाणार नाही. या आजारापासून वाचण्यासाठी इतर कोणता पर्याय शोधला जात आहे. ते म्हणाले की, या आजाराचा कोरोनाशी काहीच संबंध नाही. माणसांवर याचा काहीच परिणाम होणार नाही.

'डुकरांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू'

बोरा पुढे म्हणाले की, 2019 च्या आकडेवारीनुसार, राज्यात 21 लाखा डुकरं होती, जी वाढून 30 लाख झाली आहेत. आम्ही जानकारांशी चर्चा केली आहे की, आफ्रीकन स्वाइन फ्लू पासून डुकरांना कसे वाचवले जाऊ शकेल? ज्या डुकरांना अद्याप लागण झालेली नाही, अशा डुकरांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. संक्रमण असलेल्या परिसरातील एक किलोमीटर भागात सँपल घेतले जात आहेत. जे डुकरं संक्रमित असतील, त्यांनाच मारले जाईल. दररोज अपडेट घेतले जाईल आणि पुढील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.

डुकराचे मांस, लाळ, रक्त आणि टिश्युपासून पसरते संक्रमण

बोरा यांनी सांगितल्यानुसार, गुवाहाटीच्या तीन लॅब्समध्ये टेस्टिंग केली जात आहे, पण ही पुरेशी नाही. त्यामुळेच अधिकाऱ्यांना आरोग्य विभागाशी संपर्क करण्यास सांगितले आहे. या व्हायरसचे संक्रमण मांस, लाळ, रक्त आणि टिश्युपासून पसरतो. त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात डुकरांचे ट्रास्पोर्टेशन केले जाणार नाही. शेजारील राज्यांनाही डुकरांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

माणसांना धोका नाही, पण त्यांच्या मार्फत संक्रमण पसरू शकते

आफ्रीकन स्वाइन फ्लू मागच्या वर्षी एप्रिलमध्ये चीनच्या शिजांगमधून सुरू झाले होते. शिजांगची सीमा अरुणाचल प्रदेशाला लागून आहे. त्यामुले अशी शंका आहे की, हा व्हायरस आधी अरुणाचल प्रदेशमध्ये आणि तेथून असाममध्ये आला. भटके आणि फार्ममधल्या डुकरांमध्ये या व्हायरसचे लक्षण आढळुन आले आहे. एका शेतकऱ्याची 230 डुकरे मेली. त्यापूर्वी त्याच्या एका कर्मचाऱ्याचे डुक्कर मले होते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या मार्फत हे संक्रमण पसरल्याली शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हा व्हायरस माणसांमधून पसरत आहे, पण त्यांच्यावर याचा काही परिणाम होत नाहीये.

बातम्या आणखी आहेत...