आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याची आज 'नार्को टेस्टनंतर मुलाखत' होणार आहे. यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅब म्हणजेच एफएसएलची चार सदस्यीय टीम तिहार तुरुंगात जाणार आहे. गुरुवारी झालेल्या नार्को चाचणीत आफताबने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली, असे फॉरेन्सिक सायन्स लॅबचे सहाय्यक संचालक संजीव गुप्ता यांनी सांगितले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आफताबने श्रद्धाचा मोबाईल आणि कपडे कुठे फेकले याची माहितीही दिली आहे. दिल्ली पोलिसांनी आफताबला गुरुवारी सकाळी 8.40 वाजता रोहिणी येथील बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेले होते. जेथे चाचणीपूर्वी त्याची सामान्य तपासणी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 10 वाजता नार्को चाचणी सुरू झाली आणि सुमारे दोन तासांनंतर ती संपली.
रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने विचारलेल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरे इंग्रजीत दिली. संजीव गुप्ता म्हणाले की, नार्को चाचणीवेळी मानसशास्त्रज्ञ, फॉरेन्सिक लॅब रोहिणीचे छायाचित्र तज्ज्ञ आणि आंबेडकर रुग्णालयातील डॉक्टर उपस्थित होते. यापूर्वी आफताबनेही पॉलीग्राफ चाचणीत श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली होती.
आफताबच्या चौकशीशी संबंधित 3 महत्त्वाच्या गोष्टी...
1. ब्रेन मॅपिंग देखील होऊ शकतेफॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FS) टीमने नार्को चाचणीची तयारी पूर्ण केली आहे. नार्को चाचणीवेळी एफएसएल टीमसोबत डॉक्टरही उपस्थित राहणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, जर नार्को टेस्टमधून काही निष्पन्न झाले नाही तर, पोलिस आफताबच्या ब्रेन मॅपिंग टेस्टचीही मागणी करू शकतात.
2. आफताब सर्व काही मान्य करत होता, इथेच संशय अधिक वाढलातपासात सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, आफताब खूप हुशार आहे आणि केव्हाही या प्रकरणात नवीन वळण आणू शकतो. आतापर्यंत तो पोलिसांना तपासात संपूर्ण सहकार्य करत आहे. पॉलीग्राफ आणि नार्को टेस्टसाठीही तयार झाला आहे. त्याचवेळी त्याच्या चांगल्या वागणुकीवर पोलिसांना संशय येत आहे.
3. चौकशीदरम्यान आफताब खूप कॉन्फिडन्ट होताचौकशीदरम्यान आफताब खूप कॉन्फिडन्ट असल्याचेही पोलिस सूत्रांकडून समजले आहे. जेव्हा त्याला प्रश्न विचारला जातो तेव्हा तो उत्तरे खूप फास्ट आणि रिलॅक्स देतो. यावरून तो सर्वकाही प्लॅननुसार उत्तर देत असल्याचे दिसून येते. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आफताबला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते, तेव्हा श्रद्धाच्या शरीराचे काही अवयव त्याच्या दिल्लीतील फ्लॅटमध्ये होते असाही पोलिसांना संशय आहे.
पॉलीग्राफ चाचणीचा निकाल- आफताबने खुनाची कबुली दिली, पण पश्चाताप नाही
आफताबची पॉलीग्राफ चाचणी पूर्ण झाली असून त्याचा अंतिम अहवाल तयार केला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चौकशीदरम्यान आफताबने आपणच श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. तसेच श्रध्दाच्या हत्येचा त्याला कोणताही पश्चाताप नसल्याचे म्हटले.
आफताबला वाचवणाऱ्या पोलिसांना मिळाले बक्षीस
श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबला वाचवणाऱ्या पोलिसांना बक्षीस मिळाले आहे. दिल्ली पोलीस आयुक्तांनी कौतुक करत 10-10 हजार रुपये दिले आहेत. आफताबवरील हल्ल्यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्यामुळे आनंद व्यक्त केला.
प्रत्यक्षात सोमवारी रोहिणीतील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) बाहेर आफताबला घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनवर ४-५ जणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातात तलवारी होत्या. या हल्लेखोरांपासून पोलिसांनी आफताबला वाचवले होते. याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली होती. चौघांचा शोध सुरू आहे.
आफताबचे ब्रेन मॅपिंग होण्याचीही शक्यता, जाणून घ्या काय आहे ते?
आपला मेंदू अब्जावधी न्यूरॉन्सने बनलेला असतो. हे न्यूरॉन्स केवळ शरीराच्या सर्व भागांतून मेंदूपर्यंत संदेश पाठवतात आणि मेंदूकडून शरीराच्या सर्व भागांमध्ये संदेश पाठवतात. ते लहरींच्या स्वरूपात संदेशांची देवाणघेवाण करतात. ब्रेन मॅपिंग चाचणीमध्ये या लहरींचे परीक्षण केले जाते. याद्वारे, व्यक्तीची मानसिक स्थिती तपासली जाते.
याचा वापर गुन्हेगारांकडून रहस्ये काढण्यासाठी देखील केला जातो. या प्रक्रियेत, आरोपीला प्रश्न विचारले जातात आणि जेव्हा तो उत्तर देतो तेव्हा त्याच्या प्रतिसादावर लक्ष ठेवले जाते.
श्रद्धा हत्याकांडात नवा खुलासा : आफताबच्या नव्या मैत्रिणीने दिले स्टेटमेंट
श्रद्धा हत्याकांडात आफताबची नवी गर्लफ्रेंड समोर आली आहे. आपला श्रद्धाच्या हत्येशी किंवा त्याच्या तुकड्यांशी काहीही संबंध नसल्याचा दावा तिने केला आहे. जेव्हा ती आफताबच्या घरी त्याला भेटायला गेली होती. तेव्हा आफताबने या घरात श्रद्धाचे तुकडे ठेवले होते याची आपल्याला कल्पना नव्हती, असे तिने सांगितले. | संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
हत्येपूर्वी पाहिला 'दृश्यम', दृश्यम पार्ट-2 ची वाट पाहत होता
आफताबने कबूल केले आहे की, श्रद्धाच्या हत्येपूर्वी त्याने 'दृश्यम' हा बॉलिवूड चित्रपट पाहिला होता, तो पार्ट-2 चीही वाट पाहत होता. तो हत्येनंतरचे चित्रपटातील काही दृष्ये पाहूनच कथा रचण्याचा प्रयत्न करत होता. फताबने प्लॅनिंग करून खून केला आणि नंतर श्रद्धाचे मित्र आणि कुटुंबीयांशी बोलून तो पुरावे तयार करायचा. यातून तो निर्दोष मुक्त होऊ शकेल असाच त्याचा डाव होता. या प्लॅनमुळे आफताब सतत श्रद्धाच्या मित्रांशी फोन आणि सोशल मीडियावर बोलत होता. श्रद्धा मला सोडून गेल्याचे वारंवार तो त्यांच्या मनात बिंबवत होता.
आफताबने मारहाणीनंतर 5 दिवसांनी श्रद्धाला नेले होते रुग्णालयात
मुंबईच्या ओझोन रुग्णालयाचे डॉक्टर शिवप्रसाद शिंदे यांनी माध्यमांना सांगितले की, 3 डिसेंबर 2020 रोजी श्रद्धा त्यांच्याकडे उपचारासाठी आली होती. तिच्या शरीरावर जखमा होत्या. शारीरीक मारहाणीमुळे तिला चालताही येत नव्हते. पण तिने काहीच स्पष्टपणे सांगितले नव्हते. दिव्य मराठीकडे श्रद्धाचे सर्वच वैद्यकीय रिपोर्ट्स आहेत. त्यावरून तिच्या मान व पाठीवर गंभीर इजा झाली होती हे स्पष्ट होते. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.