आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After 10 Months, Farmers On The Street; Lakhimpur Becomes 'mini Punjab', Demands Removal Of Union Minister Of State Teni

ग्राउंड रिपोर्ट:10 महिन्यांनंतर शेतकरी रस्त्यावर; लखीमपूर बनले ‘मिनी पंजाब’, केंद्रीय राज्यमंत्री टेनी यांची हकालपट्टी करण्याची मागणी

एम. रियाज हाशमी/ विजय उपाध्याय|लखीमपूर खीरी/लखनऊ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरीमध्ये शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन ७५ तास चालणार असून ते संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) आणि टिकैत गटाच्या संयुक्त नेतृत्वात होत आहे. बाजार समितीच्या ज्या टीनशेडमध्ये शेतातून येणारा माल विकला जात होता तिथे आता हजारो शेतकऱ्यांच्या रंगीबेरंगी पगड्या दिसत आहेत. हिंसाचारप्रकरणी न्याय मिळावा व इतर मागण्या लावून धरत केंद्राच्या विरोधात पुन्हा मोठ्या प्रमाणात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनात भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत केशरी पगडीत दिसले. दिल्लीतील आंदोलन व तिकुनियातील हिंसाचारानंतर सरकारने आश्वासन पाळले नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. या आंदोलनाकडे २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीचे प्रेशर पॉलिटिक्स म्हणून बघितले जात आहे. त्यामुळे हिंसाचाराचे प्रमुख आरोपी आशिष मिश्रा मोनूचे वडील केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांना शेतकऱ्यांनी लक्ष्य केले आहे. आंदोलनाचे केंद्र असलेला हा जिल्हा यूपीचे शेवटचे टोक आहे आणि इथे टिकैत यांचा प्रभाव असूनही पहिल्याच दिवशी पश्चिम यूपीतील शेतकऱ्यांचा सहभाग कमी दिसला. बहुतांश शेतकरी पंजाब, हरियाणा व राजस्थानातील जिल्ह्यांतून आले. शेतकऱ्यांच्या हातात आपापल्या संघटनांचे झेंडे होते. यात पंजाबच्या महिलाही सहभागी झाल्या आहेत.

धरणे आंदोलन शनिवारपर्यंत चालेल. यासाठी यूपी सरकारचे अधिकारी व्यवस्था करत आहेत. स्वच्छतागृहांची व्यवस्था न झाल्याने शेतकरी नाराज आहेत. व्यवस्था झाली नाही तर हे आंदोलन जिल्हा मुख्यालयासमोर केले जाईल, अशी धमकी राकेश टिकैत यांनी दिली आहे. सुखदेव सिंह सांगतात, २,००० शेतकरी सहभागी झाले आहेत.

शेतकऱ्यांकडून टेनी यांचा विरोध
हिंसाचार टेनींच्या इशाऱ्यावर झाला होता. ते १२० आरोपी आहेत. आमचे आंदोलन कमी पडणार नाही. आम्ही हायकोर्टातून मंत्री पुत्र आशिषचा जामीन रद्द केला.
-राकेश टिकैत, किसान युनियन

आशिष मिश्रांना जामीन नाही : हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रांना अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने जामीन देण्यास नकार दिला. १५ जुलैला आदेश राखून ठेवला होता.

मंत्र्यांची हकालपट्टी करा, शेतकऱ्यांची सुटका करा
-४ शेतकरी व एका पत्रकाराच्या हत्येबद्दल गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनींची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. अटक करून खटला चालवा.
-हिंसाचारावरून तुरुंगात पाठवलेल्या शेतकऱ्यांची सुटका. दिल्ली आंदोलनात दाखल गुन्हे मागे घ्या.
-सर्व पीकांवर स्वामीनाथन आयोगाच्या फॉर्म्युल्याद्वारे किमान हमीभाव कायदा बनवा.
-वीज विधेयक- २०२२ मागे घ्या. सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा. युपीतील साखर कारखान्यांतून ऊस उत्पादकांना देय रक्कम मिळावी.

बातम्या आणखी आहेत...