आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्वॅारंटाइन:18 महिन्यांनंतर विदेशी प्रवाशांसाठी क्वॅारंटाइन होण्याची अट संपुष्टात, चार्टर्ड उड्डाणांसोबतच व्यावसायिक उड्डाणांनाही सूट राहील

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने अमेरिका, ब्रिटनसह ९९ देशांतून येणाऱ्या लोकांसाठी क्वॅारंटाइन राहण्याची अट १८ महिन्यांनंतर संपुष्टात आणली आहे. याआधी १५ ऑक्टोबरला विदेशी पर्यटकांना चार्टर्ड उड्डाणांद्वारे भारतात येण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली होती. आता या ९९ देशांतून व्यावसायिक उड्डाणांद्वारे येणाऱ्या लोकांनाही सूट राहील. या प्रवाशांना कोविड निगेटिव्ह अहवाल आणि लसीकरण प्रमाणपत्र हवाई सुविधा पोर्टलवर अपलोड करावे लागेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले, ‘काही देश असे आहेत, ज्यांच्याशी भारताच्या लसीकरण प्रमाणपत्रांच्या मान्यतेबाबत समझोता झालेला आहे. अशाच प्रकारे काही देश असेही आहेत, ज्यांच्याशी अशा प्रकारचा कुठलाही समझोता झालेला नाही. तरीही या देशांत लसीकरण झालेल्या भारतीयांना क्वाॅरंटाइनमध्ये राहावे लागत नाही. अशा सर्व देशांसाठी भारतानेही क्वाॅरंटाइमध्ये राहण्याची अट हटवली आहे.” केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पर्यटन उद्योगाला मोठा फायदा होईल, असे मत आयआरसीटीसीच्या संचालक रजनी हसिजा यांनी व्यक्त केले आहे.

देशांतर्गत पर्यटकांची आधीपासूनच गर्दी, विदेशी पर्यटकांमुळे आणखी फायदा होईल
भारतात मे महिन्यात कोरोनाचे दररोज चार लाख नवे रुग्ण आढळत होते. तेव्हापासून आतापर्यंत रोज आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सतत घसरण सुरू आहे. आता दररोज १५००० पेक्षा कमी रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे देशांतर्गत प्रवासही जवळपास प्री-कोविड स्तरापर्यंत पोहोचला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून गोव्यात आणि हिल स्टेशनला पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. तरीही नव्या रुग्णांत घट होत आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता एक-एक करून सर्व निर्बंध शिथिल करत आहे किंवा पूर्णपणे हटवत आहे. अशा स्थितीत विदेशी पर्यटक आल्यास पर्यटन उद्योगाला खूप बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सिंगापूर आता भारतीय प्रवाशांनाही २९ नोव्हेंबरपासून क्वाॅरंटाइन करणार नाही
सिंगापूरला जाणाऱ्या भारतीय प्रवाशांना २९ नोव्हेंबरपासून क्वाॅरंटाइन होण्याची गरज पडणार नाही. सिंगापूरने भारत आणि इंडोनेशियात लस घेतलेल्या लोकांनाही सूट देण्याच्या योजनेत समाविष्ट केले आहे. भारत आणि सिंगापूर या दोन्ही देशांचे प्रवासी आता क्वाॅरंटाइनविना परस्परांच्या देशांत ये-जा करू शकतील. तथापि, प्रवाशांसाठी मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचा प्रोटोकॉल अनिवार्य असेल. सिंगापूरच्या निर्णयामुळे भारतीय प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.सिंगापूरच्या चांगी विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांपैकी जवळपास ७% प्रवासी भारतातील असतात. त्या हिशेबाने भारत सिंगापूरसाठी उत्पन्नाच्या दृष्टीने तीन सर्वात मोठ्या बाजारांपैकी एक आहे.

बातम्या आणखी आहेत...