आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After 1947 Damage, Temple Revives After 75 Years, Idol From Sringeri Mutt, Karnataka

LOC वर नवरात्रीपासून शारदा मंदिराचे दर्शन:1947 मध्ये हानी, 75 वर्षांनंतर मंदिरात उत्सव, कर्नाटकच्या शृंगेरी मठाकडून मूर्ती

श्रीनगर / हारुण रशीद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मीरच्या कुपवाडा येथे नियंत्रण रेषेजवळ (एलआेसी) टिटवालमध्ये २२ मार्चला चैत्र नवरात्रीच्या निमित्त शारदा माता मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे. १९४७ मध्ये पाकिस्तानच्या आदिवासींच्या हल्ल्यात मंदिराची हानी झाली. मंदिराच्या जीर्णोद्धारात काश्मीरच्या सर्व समुदायातील लोकांनी सहकार्य केले. डिसेंबर २०२१ मध्ये मंदिर जीर्णोद्धाराला सुरुवात झाली होती. हे काम आता पूर्ण झाले. कर्नाटकच्या शृंगेरी मठाने मूर्ती सोपवली आहे. मंदिराजवळच गुरुद्वाराचेही काम पूर्ण झाले आहे. या गुरुद्वाराचीदेखील फाळणीच्या वेळी हानी झाली होती. देवीची मूर्ती सध्या टिक्करमध्ये आहे. २० मार्चला तिची यात्रा काढून टिटवालला ती रवाना होईल. त्यानंतर प्राणप्रतिष्ठा होईल.

पीओकेमध्ये शारदा पीठापर्यंत कॉरिडॉर बनवा, काश्मिरी पंडित सेव शारदा कमिटी काश्मीर (एसएससीके) याचे प्रमुख रविंद्र पंडित म्हणाले, पूर्वी श्रीनगरहून शारदादेवी मंदिरपर्यंत वार्षिक यात्रा काढली जात होती. या प्राचीन धार्मिक यात्रेला पुन्हा सुरू केले जावे. यात्रा कर्तारपूर कॉरिडॉरच्या धर्तीवर सुरू केली जाऊ शकते. आता काश्मिरी पंडित आपली आराध्य देवी शारदा मातेच्या दर्शनाला पीआेकेमध्ये जाऊ शकत नाहीत. शारदादेवी मंदिर सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये नीलम नदीच्या किनारी शारदी गावात आहे. ५ हजार वर्षे प्राचीन हे मंदिर नियंत्रण रेषेपासून सुमारे २५ अंतरावर आहे. या देवीला १८ महाशक्तिपीठांपैकी मानले जाते. इतिहासतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर अमरनाथ, अनंतनागच्या मार्तंड सूर्य मंदिराप्रमाणे काश्मिरी पंडितांसाठी श्रद्धेचे केंद्र राहिले आहे.

बातम्या आणखी आहेत...