आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झारखंड:22 वर्षांनी सिद्धी पूर्ण होण्यासाठी संन्यासी बनून भिक्षा मागण्यासाठी घरी परतला पती, पत्नीने ओळखले, आता कुटुंबीय व ग्रामस्थांकडून मनधरणी

कांडी (झारखंड) / प्रियरंजन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

२२ वर्षांपूर्वी बेपत्ता व्यक्ती अचानक समोर आली तर काय होईल. या भावना शब्दात व्यक्त करता येणार नाही. काहीसे असेच झाले कांडी तालुक्यातील सेमौरा गावातील सविताचे. तिचा पती उदय साह गेल्या रविवारी समोर येऊन उभा राहिला तेव्हा. सविता, दोन मुले व आई-वडिलांना सोडून उदय अचानक निघून गेला होता. खूप शोध घेतला, मात्र सापडला नाही. यामुळे कुटुंबीयांनी तो मेल्याचे समजून घेतले. सविता छत्तीसगडमध्ये माहेरी निघून गेली. नंतर झारखंडला परत येऊन शेती करून मुलांना वाढवले. सविताने एकटीनेच जबाबदारी पार पाडली. गेल्या रविवारी उदय साधू बनून हातात सारंगी घेऊन त्याच्या घरी आला आणि गोरखनाथचे भजन गात भीक मागू लागला. गावात कोणी ओळखले नसले तरी पत्नीच्या नजरेतून सुटू शकला नाही. सविताने त्याला ओळखले.

एवढ्या वर्षांनी पतीला बघून तिच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा सुरू झाल्या. मात्र उदय ओळख लपवत राहिला. काही वेळात गावकरीही घरी गोळा झाले. शेवटी उदयला सत्य स्वीकारावे लागले. यानंतर तो पत्नीकडे भीक मागू लागला. पत्नीकडून भीक मिळेपर्यंत सिद्धी प्राप्त होणार नाही, म्हणून भीक देऊन मला सांसारिक जीवनातून मुक्तीच्या कर्तव्याचे पालन करू द्या, असे सांगितले. नातेवाइकांसह अनेक जण त्याला संन्यासी रूपातून मुक्ती देण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी बाबा गोरखनाथांच्या धामावर भंडाऱ्याची तयारी सुरू आहे. यासाठी ग्रामस्थ पैसे व अन्नधान्य गोळा करत आहेत. उदयही जवळपास फिरत आहे, जोपर्यंत पत्नीकडून भीक मिळत नाही, त्याचा हेतू पूर्ण होणार नाही. त्याच्याबाबत समजल्यावर परिसरातील लोकही त्याला भेटायला येत आहेत.

पत्नी व मुलांच्या आग्रहावर उदय म्हणाला, साधूंना समजावून परत येईल
जेव्हा उदय गेला होता तेव्हा मुलगा ३ तर मुलगी १ वर्षाची होती. वडिलांच्या प्रेमाला वंचित मुलांनी आईसोबत उदयला कौटुंबिक जीवनात परतण्यासाठी समजावण्याचे बरेच प्रयत्न केले. मात्र उदयने स्पष्ट नकार दिला. मंगळवारी सकाळी उदय दोन साधूंसोबत गाडीने कोठे तरी जाण्यासाठी निघाला असता सविता व मुलेही गाडीत बसले. तेव्हा उदयने सांगितले की, साधूंना समजावून लवकर परत येईन.

बातम्या आणखी आहेत...