आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वे धावणार:51 दिवसांनंतर आज दिल्ली, इतर शहरांतून 8 रेल्वे धावणार, 3 तासांत 54 हजार तिकिटे बुक

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • आठ रेल्वेंचे पुढील 5 दिवसांपर्यंत बुकिंग फुल

शरद पांडेय 

मंगळवारी ५१ दिवसांनंतर प्रवासी रेल्वे धावतील. पहिली रेल्वे सायंकाळी ३.४५ वाजता दिल्ली ते बिलासपूरपर्यंत जाईल. रात्री ८.४० वाजेपर्यंत विविध शहरांतून ८ रेल्वे रवाना होतील. विशेष रेल्वेंसाठी सोमवारी ६ वाजता बुकिंग सुरू होताच ३ तासांतच ५४ हजार तिकिटे बुक झाली. १० रेल्वेंची सर्व श्रेणींची पाच दिवसांपर्यंतची सर्व आसने फुल झाली आहेत. मुंबई, पाटणा, हावडासह काही रेल्वेंची तर १० मिनिटांतच बुकिंग फुल झाली. कन्फर्म ई-तिकीट असणाऱ्या प्रवाशांना ई-पासची गरज पडणार नाही, त्यांना न अडवता रेल्वेस्टेशनवर प्रवेश मिळेल, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले. सध्या ७ दिवसांनंतरची तिकिटे बुक करण्यात येत आहेत. 

मुंबई, पाटणा, हावडा आणि भुवनेश्वरचे बुकिंग १० मिनिटांतच फुल; फर्स्ट, थर्ड एसीला पसंती   मुंबई, पाटणा, हावडा आणि भुवनेश्वरसह काही रेल्वेंचे तर १० मिनिटांतच बुकिंग फुल झाले.  फर्स्ट आणि थर्ड एसीला पसंती राहिली. या दोन श्रेणी बुक झाल्यानंतर सेकंड एसीचे बुकिंग झाले. एकानंतर एक बुकिंग सुरू केले. सर्वप्रथम १२ मे रोजी धावणाऱ्या रेल्वेंचे बुकिंग झाले. यात हावडा - दिल्ली रेल्वेचे बुकिंग सुरू झाले, जे १० मिनिटांतच फुल झाले. मुंबई ते दिल्ली रेल्वेत एक मिनिटांत २३० आसने भरली.  

इच्छित स्थळी पोहोचल्यावर १४ दिवस क्वॉरंटाइन 

- रेल्वेत जेवण मिळणार नाही. इच्छित स्थळी पोहोचल्यावर १४ दिवस क्वॉरंटाइन व्हावे लागेल.

- रेल्वे सुटण्याच्या दीड तास आधी स्टेशनवर यावे लागेल. थर्मल स्क्रीनिंगनंतर लक्षणे नसणाऱ्या प्रवाशांनाच पाठवले जाईल. 

- रेल्वे सुटण्याच्या १५ मिनिटे आधी प्रवेश मिळेल. स्टेशन आणि रेल्वेत मास्क अनिवार्य राहील.   

- राजधानीचे भाडे लागेल. थर्ड एसीत ५२, सेकंड मध्ये ४८ प्रवासी असतील. आरोग्य सेतू अॅप आवश्यक. 

बातम्या आणखी आहेत...