आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After 73 Days The Border Is Open For Selected Foreigners, Foreign Engineers Will Come To India

आंतरराष्ट्रीय प्रवास:73 दिवसांनंतर निवडक विदेशींसाठी सीमा खुली, विदेशी इंजिनिअर भारतात येतील

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतात येण्यास इच्छुक लोकांना काही अटींसह नवीन व्हिसा घ्यावा लागेल

कोरोना संकटामुळे ७३ दिवसांपासून बंद असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवासात केंद्र सरकारने बुधवारपासून अंशत: सूट दिली. आता काही अटींसह विदेशी व्यावसायिक, आरोग्य कर्मचारी, इंजिनिअर भारतात येऊ शकतील. यासाठी त्यांना नवीन व्हिसा घ्यावा लागेल.

गृह मंत्रालयाच्या निर्णयानुसार, वेळापत्रकात नसलेल्या व्यावसायिक किंवा चार्टर्ड विमानात व्यावसायिक व्हिसावर येणाऱ्या विदेशी व्यावसायिकांना भारतात येण्याची सूट मिळेल. तसेच, प्रयोगशाळा आणि कारखान्यांसह भारतीय आरोग्य क्षेत्रातील सुविधांमध्ये तांत्रिक काम करण्यास इच्छुक विदेशी आरोग्य व्यावसायिक, आरोग्य संशोधक, अभियंता आणि टेक्निशियन देखील येऊ शकतील. मान्यताप्राप्त आणि नोंदणीकृत आरोग्य सेवा सुविधा केंद्र, औषधी कंपनी किंवा विद्यापीठाच्या पत्रावर त्यांना येण्याची परवानगी असेल.

भारतात स्थायिक विदेशी व्यावसायिक संस्थांकडून प्रवास करणाऱ्या विदेशी अभियंता, डिझाइन किंवा इतर तज्ञांनाही सूट मिळेल. यात उत्पादन, डिझाइन, सॉफ्टवेअर व आयटीसह आर्थिक क्षेत्रातील सर्व कंपन्यांचा समावेश आहे. भारतातील नोंदणीकृत कंपनीच्या निमंत्रणावर भारतातील विदेशी यंत्र आणि उपकरणांचे उत्पादन, दुरुस्ती आणि देखभालीसाठी प्रवास करणारे विदेशी टेक्निशियन व इंजिनिअर भारतात येऊ शकतील.

बातम्या आणखी आहेत...